तरुण भारत

आजही मुसळधार पाऊस

चोविस तासात फोंडय़ात सर्वाधिक पाऊस

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गणेश चतुर्थीमध्ये पाऊस मुक्काम करणार हे निश्चित झाले असून दि. 11 सप्टेंबर पर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने काल मंगळवारी सायंकाळी दिला. गेल्या 24 तासात राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला, तर आगामी 48 तासात आणखी मुसळधार पाऊस कोसळेल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. पणजीत 10 तासात पाऊण इंच पावसाची नव्याने नोंद झाली आहे.

मान्सून सक्रिय बनलेला आहे. ऐन चतुर्थीच्या उत्सवावर पाणी टाकण्यासाठी तो आता सज्ज झालेला आहे. राज्यात आज सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने सायंकाळी दिला. पावसाबरोबरच राज्यात जोरदार वादळी वारे वाहाण्याची शक्यता वर्तविली आहे. सध्याचा पाऊस हा शेती बागायतीसाठी लाभदायक ठरला असला तरी मुसळधार पावसाने गणेश चतुर्थी उत्सव काळात फुलांचा तुटवडा जाणवणार आहे. गेले आठ दिवस सुरू झालेल्या पावसाने फुलांचे प्रमाण पुन्हा कमी झाले आहे. अन्यथा ऑगस्टच्या 15 तारीखनंतर झाडांवर पुन्हा एकदा फुले बहरत असतात. पावसाने जोर वाढविल्यामुळे भक्तगणांसमोर पुजेसाठी लागणाऱया फुलांची समस्या जाणवणार आहे.

मंगळवारी दिवसभरात सर्वत्र जोरदार पावसाने हजेरी लावली होती. सर्व ठिकाणच्या नद्यांमधील पाण्याची पातळी पुन्हा वाढलेली आहे. मात्र पुरसदृष्य स्थिती आता कुठेही नाही. आज मात्र पावसाचा जोर वाढल्यास पुरसदृष्य स्थिती काही भागात निर्माण होऊ शकते. दरम्यान यंदाचा पाऊस हा आता सरासरीपेक्षा दोन इंच पुढे गेला आहे.

Related Stories

पावसाच्या सरीतही फोंडा मार्केटात ग्राहकांची रेलचेल

Amit Kulkarni

मेळावलीसीयांची भावना सरकारने समजून घ्यावी

Patil_p

कर्फ्यू कालावधीत 28 पर्यंत वाढ

Patil_p

स्व. मनोहर पर्रीकरांच्या कल्पनेतील राज्यात बंधारे बांधण्याचे नियोजन झाले तर म्हादई आमच्यापुढे मोठी समस्या नाही- माजी मंत्री दयानंद मांद्रेकर

Omkar B

विरोधक आपल्या राजिनाम्याच्या अफवा पसरत आहे

Patil_p

डिचोली तालुक्मयाला जोरदार पावसाने झोडपले

Amit Kulkarni
error: Content is protected !!