तरुण भारत

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू

प्रतिनिधी / नागठाणे :

अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. ग्वाल्हेर-बेंगलोर आशियाई महामार्गावर काशीळ (ता.सातारा) गावच्या हद्दीत मंगळवारी रात्री उशिरा ही घटना घडली.

Advertisements

पंकज मधुकर थोरात (वय.२३) व शुभम एकनाथ लोंढे (वय.२५,दोघे रा.हिंगनोळे,पो.कोरिवळे,ता.कराड) असे मृत युवकांचे नाव आहे.

याबाबत बोरगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,शुभम लोंढे याचा मावसभाऊ सचिन चंद्रकांत जाधव हा कोडोली (सातारा) येथे रहावयास असून शुभम लोंढे हा वरचेवर कोडोली येथे येत असे.मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास शुभम लोंढे व त्याचा मित्र पंकज थोरात हे साताऱ्यातून सचिन जाधव यांचा मित्र स्वप्नील गायकवाड(रा.दत्तनगर,कोडोली) याची दुचाकी घेऊन हिंगनोळेकडे जावयास निघाले. यावेळी दुचाकी पंकज थोरात चालवत होता. रात्री ११ च्या सुमारास महामार्गावर काशीळ गावच्या हद्दीत श्रीराम मंगल कार्यालयासमोर त्यांची दुचाकी आली असता तिला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात पंकज थोरात व शुभम लोंढे दोघेही गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाले. याबाबत अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वर्षा डाळिंबीकर करत आहेत.

Related Stories

सातारा : भुईंजमध्ये नारळाच्या झाडावर पडली वीज

datta jadhav

राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत सृष्टी रासकरला कांस्यपदक

datta jadhav

सातारा : महामार्गावर बँक मँनेजरला चाकूचा धाक दाखवून लुटले

datta jadhav

महापालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन

Abhijeet Shinde

महिलेवर अत्याचारप्रकरणी अल्पवयीन मुलावर गुन्हा

datta jadhav

बटरफ्लाय पॉईंट होणार कुलूपबंद

Patil_p
error: Content is protected !!