तरुण भारत

समांतर सरकार स्थापन करू -एनआरएफ

तालिबानचे सरकार अवैध -पंजशीरमधून अहमद मसूद यांची घोषणा

वृत्तसंस्था  / काबूल

Advertisements

अफगाणिस्तानवर कब्जानंतर तालिबानने सरकार स्थापन केले असले तरीही पंजशीर प्रांतातील लढवय्यांनी अद्याप हार मानलेली नाही. नॅशनल रेजिस्टेन्स प्रंटने (एनआरएफ) आता अफगाणिस्तानात समांतर सरकार चालविण्याची आणि तालिबानच्या सरकारला मान्य न करण्याची घोषणा केली आहे.

पंजशीर या प्रांतावर तालिबानचा अद्याप पूर्णपणे कब्जा झालेला नाही. तालिबानने पंजशीरच्या काही भागांवर कब्जा केला आहे, पण पंजशीरमधील लढवय्यांनी अद्याप हार मानलेली नाही. ते डोंगराळ भागातून तालिबानी दहशतवाद्यांवर हल्ले करत आहेत.

नॅशनल रेजिस्टेन्स प्रंट ज्याला नॉर्दन अलायन्स देखील म्हटले जाते, त्याचे नेतृत्व अहमद मसूद करत आहेत. मंगळवारी रात्री तालिबानने स्वतःच्या नव्या कॅबिनेटची घोषणा केली. याबद्दल बोलताना अहमद मसूद यांनी आपण अफगाणिस्तानात समांतर सरकार चालविणार असल्याचे सांगितले आहे. याकरता नेत्यांसोबत विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.

तालिबानचे काळजीवाहू सरकार अवैध आणि अफगाणी लोकांशी शत्रुत्वाने वागणार असल्याचे एनआरएफने म्हटले आहे. तालिबानच्या काळजीवाहू सरकारमध्ये मुल्ला हसन अखुंदला पंतप्रधानपद देण्यात आले आहे. तालिबान हा अफगाणिस्तानसोबत पूर्ण जगासाठी धोकादायक असल्याचे एनआरएफने सांगितले आहे.

दहशतवादी चालविणार सरकार

तालिबानने नियुक्त केलेल्या सरकारमध्ये दहशतवाद्यांचा भरणा आहे. यातील काही मंत्र्यांवर तस्करीसाठी बंदी घालण्यात आली आहे. तर एकावर 73 कोटी रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे. तसेच तालिबानने 33 मंत्र्यांच्या कॅबिनेटमध्ये एकाही महिलेला स्थान दिलेले नाही.

Related Stories

भीषण ट्रक अपघातात मेक्सिकोत 53 ठार

Patil_p

किम जोंग उन यांची प्रकृती खालावली, शस्त्रक्रियेनंतर धोका वाढला

prashant_c

91 वर्षीय अधिकाऱयाचा ‘निवृत्ती’चा विचार नाही

Patil_p

फिलिपाईन्समध्ये विमान कोसळले

Patil_p

विकीलीक्सच्या संस्थापकाचे अमेरिकेला प्रत्यार्पण

Patil_p

असा कसा हा मासा?

Amit Kulkarni
error: Content is protected !!