तरुण भारत

चढउताराच्या प्रवासात बाजार प्रभावीत

सेन्सेक्समध्ये 29 अंकांनी घसरण – इन्फोसिस आणि टीसीएस तोटय़ात

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी भारतीय बाजार व राष्ट्रीय बाजारात चढउताराचे वातावरण राहिल्याने सेन्सेक्स व निफ्टी दोन्हींचे निर्देशांक किंचित घसरुन बंद झाले आहेत. जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेतामुळे बाजारात इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि टीसीएस यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.

सेन्सेक्समध्ये नेस्ले कंपनीचे समभाग सर्वाधिक 2 टक्क्यांनी घसरणीत राहिले असून यासोबत मारुती सुझुकी, बजाज फिनसर्व्ह, बजाज ऑटो, टीसीएस आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभाग प्रामुख्याने प्रभावीत राहिले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये कोटक बँक, टायटन, एनटीपीसी आणि सन फार्मा यांचे समभाग लाभात राहिले आहेत.

सदरच्या चढउताराच्या प्रवासामध्ये प्रमुख कंपन्यांच्या मदतीने दिवसअखेर सेन्सेक्स 29.22 अंकांनी घसरुन 58,250.26 वर बंद झाला आहे. ट्रेडिंगच्या दरम्यान सेन्सेक्समध्ये 400 अंकांचा चढउतार राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 8.60 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 17,353.50वर बंद झाला आहे.

दिवसभरातील कामगिरीमध्ये प्रामुख्याने बुधवारी आयटी आणि वाहन क्षेत्रातील समभागांमध्ये नफा वसुली राहिल्याने देशातील शेअर बाजारात काही प्रमाणात घसरण राहिली होती. यामध्ये जागतिक पातळीवरील नकारात्मक संकेताचा प्रभाव देशातील बाजारांवर पडला असल्याचे अभ्यासकांनी सांगितले आहे. आशियातील अन्य बाजारांमध्ये शांघाय, हाँगकाँग आणि सियोल नुकसानीत राहिले आहेत.

गुंतवणूकदारांची नजर कापड निर्मितीमध्ये कार्यरत असणाऱया कंपन्यांच्या समभागांवर राहिली होती, कारण सरकारने या क्षेत्रासाठी 10,683 कोटी रुपयाच्या उत्पादन आधारीत प्रोत्साहन योजनेला मंजुरी दिली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅप क्षेत्रातील मध्यम व लहान कंपन्यांचे समभाग नुकसानीत राहिले.

Related Stories

एचडीएफसीकडून विमानतळासाठी 500 कोटी

Patil_p

प्रेस्टीज इस्टेटने विकल्या मालमत्ता

Omkar B

रिलायन्सकडून स्टँड लाईफचे अधिग्रहण

Patil_p

नव्या उपक्रमांसाठी गुंतवणूक विक्रमी टप्प्यावर

Patil_p

सीईओ सलील पारेख यांच्या वेतनात 27 टक्के वाढ

Patil_p

जागतिक बाजारातील संकेतामुळे सेन्सेक्स तेजीत

Omkar B
error: Content is protected !!