तरुण भारत

मिरजेत लाच घेताना फौजदाराला रंगेहाथ पकडले

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई, पोक्सोतील आरोपीकडे २५ हजारांची मागितली लाच


मिरज / प्रतिनिधी

Advertisements

पोक्सो प्रकरणातील संशयितांवर केस दाखल न करण्यासाठी २५ हजारांची लाच स्विकारणरा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा एपीआय समाधान बिले याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केले जेरबंद केले आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका संशयीताला ताब्यात घेण्यात आले होते. त्याच्यावर पोक्सो कायद्यातंर्गत गुन्हा दाखल होणार होता. मात्र एपीआय बिले यांनी संबंधीत संशयीताला या गुन्ह्यातून सोडवितो. पोक्सो चा गुन्हा लावत नाही, असे सांगत मोठ्या रकमेची मागणी केली. संशयीताने त्यास असमर्थता दर्शविली. अखेर तडजोड होऊन २५ हजार रूपये बिले यांना देण्याचे ठरले. बुधवारी सायंकाळी हे पैसे देण्यात येणार होते. संबंधीत संशयीताने याची माहिती लाचलुचपत विभागाला दिली. त्यांनी बुधवारी सायंकाळी सापळा रचला. यावेळी २५ हजाराची लाच घेताना बिल यांना रंगेहात पकडण्यात आले.

Related Stories

लक्षणे नसलेल्या कोरोना रुग्णांचेही होणार निदान; ‘रॉश’ ला अमेरिकेची परवानगी

datta jadhav

मंत्री आनंदसिंह यांचे राजीनाम्याचे संकेत

Abhijeet Shinde

सांगली : मिरजेत दोन लाखांचा दारुसाठा जप्त

Abhijeet Shinde

UPSC NDA Exam १८ एप्रिलला ; परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

Abhijeet Shinde

“…तर डोळे फोडून हात कापून टाकू;” भाजपा खासदाराने काँग्रेस नेत्यांना धमकावलं

Abhijeet Shinde

”महाराष्ट्राच्या तुलनेत गुजरातमधील सरकार कमजोर त्यामुळे नरेंद्र मोदी तिथला दौरा करत असतील”

Abhijeet Shinde
error: Content is protected !!