तरुण भारत

उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारीपदी भाजपकडून धर्मेंद्र प्रधान

इतर चार राज्यांचेही प्रभारी घोषित, गोव्यासाठी देवेंद्र फडणवीस

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, पंजाब आणि मणिपूर या पाच राज्यांमध्ये लवकरच होणाऱया विधानसभा निवडणुकांसाठी भाजपने प्रभारी नेत्यांची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशासाठी केंद्रीय शिक्षण आणि कौशल्यविकास मंत्री धर्मेंद्र प्रधान यग्नांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर गोव्याचे उत्तरदायित्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर सोपविण्यात आले आहे.

धर्मेंद्र प्रधान हा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख मागासवर्गीय चेहरा असून उत्तर प्रदेशात अन्य मागासवर्गीय मतदारांची असलेली लक्षणीय संख्यग्ना लक्षात घेऊन ही निवड करण्यात आली आहे अशी राजकीय अभ्यासकांची प्रतिक्रिया आहे. प्रधान यांना सहाय्य करण्यग्नासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची नियुक्ती झाली आहे. याशिवाय केंद्रीय राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल, शोभा करंदलाजे, अन्नपूर्णा देवी, हरियाणाचे माजी मंत्री कॅप्टन अभिमन्ग्नयू आणि राज्यसभा खासदार विवेक ठाकूर तसेच सरोज पांडे यांचीही साहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

गोव्यासाठी फडणवीस

गोव्याचे निवडणूक प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती करण्यात आली. तर केंद्रीय राज्यमंत्री जी. किशन रेड्डी आणि केंद्रीय राज्यमंत्री दर्शना जरदोश यांची सह-प्रभारी म्हणून नेमणूक झाली आहे. केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी हे उत्तराखंडचे निवडणूक प्रभारी असतील. त्यांना खासदार लॉकेट चॅटर्जी आणि प्रवक्ते आर. पी. सिंग हे साहाय्य करणार आहेत, अशी घोषणा करण्यात आली.

पंजाबकरीता गजेंद्रसिंग शेखावत

पंजाबचे निवडणूक प्रभारीपद केंद खाrय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांच्याकडे देण्यात आले असून केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, केंद्रीय राज्यमंत्री मिनाक्षी लेखी आणि खासदार विनोद चावडा यांची सह-प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. केंद्रीय कामगार कल्याण मंत्री भूपेंदर यादव यांच्याकडे मणिपूरची धुरा सोपविण्यात आली आहे, अशी माहिती भाजप मुख्यालयाकडून देण्यात आली.

विधानसभा निवडणुकांसाठी सज्जता 

राज्य                          नेतृत्व, साहाय्यक

उत्तर प्रदेश                   धर्मेंद्र प्रधान (केंद्रीय शिक्षणमंत्री)

                                 अनुराग ठाकूर, अर्जुन राम मेघवाल, शोधा                            करंदलाजे, अन्नपूर्णा देवी, कॅप्टन अभिमन्यू                             सिंग, विवेक ठाकूर, सरोज पांडे

गोवा                          देवेंद्र फडणवीस (माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र)

                                 जी. किशन रेड्डी, दर्शना जरदोश

उत्तराखंड                     प्रल्हाद जोशी (केंद्रीय संसदीय व्यवहार मंत्री)

                                 लॉकेट चॅटर्जी, आर. पी. सिंग

पंजाब                                     गजेंद्र सिंग शेखावत (केंद्रीय मंत्री)

                                 हरदीपसिंग पुरी, मीनाक्षी लेखी, विनोद चावडा मणिपूर                          भूपेंदर यग्नादव (केंद्रीय कामगार कल्याण मंत्री)

Related Stories

हरियाणा सरकारने 14 जूनपर्यंत वाढविले लॉकडाऊन!

Rohan_P

बंगालमध्ये ममता बॅनर्जींचा धक्कादायक पराभव

Abhijeet Shinde

भूमी अधिग्रहणाच्या विरोधात दगडफेक

Patil_p

कुलगाम चकमकीत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान

datta jadhav

अमेरिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला अर्थमंत्री

Patil_p

कोरोना लढ्यासाठी टिक टॉक कडून 100 कोटींची मदत

prashant_c
error: Content is protected !!