तरुण भारत

हवाई दलासाठी नवीन 56 विमानांची खरेदी

40 विमानांची निर्मिती देशातच होणार- मंत्रिमंडळाची मंजुरी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

भारतीय हवाई दलासाठी (आयएएफ) सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीने बुधवारी स्पेनमधील मेसर्स एअरबस डिफेन्स आणि स्पेसकडून 56 ‘सी-295 एमडब्ल्यू’ परिवहन विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली. सी-295 एमडब्ल्यू हे 5 ते 10 टन क्षमतेचे परिवहन विमान आहे. या विमानांसाठी स्पेनशी करार करण्यात येणार असून करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर चार वर्षात सोळा विमाने प्राप्त होणार आहेत. तसेच उर्वरित 40 विमाने टाटा कन्सोर्टियमच्या सहकार्याने भारतातच तयार केली जाणार आहेत. करार पूर्ततेनंतर दहा वर्षांमध्ये ही 40 विमाने हवाई दलात दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली. ‘मेक इन इंडिया’ला प्रोत्साहन देत स्वदेशीचा नारा बुलंद करण्यासाठी केंद्र सरकारने हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे.

विमान निर्मितीच्या कार्यक्रमामुळे केंद्र सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच यामुळे भारतीय खासगी क्षेत्राला तंत्रज्ञान सधन आणि अत्यंत स्पर्धात्मक विमान उद्योगात प्रवेश करण्याची अनोखी संधी उपलब्ध होईल. परिणामी आयातीवरील अवलंबित्व कमी होईल आणि निर्यातीत अपेक्षित वाढ होईल, असा दावा करण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून भारताच्या एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रामध्ये 6 ते 10 हजार जणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. विमाने दाखल होण्यापूर्वी ‘सी-295 एमडब्ल्यू’ विमानांसाठी ‘डी’ स्तर सेवा सुविधा सर्व्हिसिंग सुविधा उभारण्याचीही योजना आहे. याव्यतिरिक्त भारतीय ऑफसेट भागिदारांकडून पात्र उत्पादने आणि सेवांच्या थेट खरेदीद्वारे त्यांचे ऑफसेट दायित्व देखील पूर्ण केले जाणार असल्यामुळे अर्थव्यवस्थेला आणखी चालना मिळणार आहे.

Related Stories

देशात 42,625 नवे बाधित, 562 मृत्यू

datta jadhav

अरुणाचल सीमेनजीक चीनने वसविली तीन गावे

Patil_p

सर्वाधिक देणगी मिळविणारा पक्ष ठरला भाजपा

Amit Kulkarni

बडगाममध्ये दहशतवादी कट उधळला

datta jadhav

गोव्यात आजपासून इफ्फीला सुरुवात

Abhijeet Shinde

2 अपघातात 14 जणांचा मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!