तरुण भारत

बीजिंग ऑलिम्पिकवर बहिष्काराची मागणी

अल्पसंख्याक गटांचे अमेरिकन नेटवर्क एनबीसीकडे आवाहन

अमेरिकन नेटवर्क एनबीसीसह जागतिक स्तरावरील बडय़ा ब्रॉडकास्टर्सनी पुढील वर्षातील हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेवर बहिष्कार टाकावा, अशी मागणी अल्पसंख्याकांच्या काही गटांनी केली. पुढील हिवाळी स्पर्धा दि. 4 फेब्रुवारीपासून खेळवली जाणार आहे. चीनमधील काही अल्पसंख्याक गटांनी ही मागणी उचलून धरली असून यात युगुर, तिबेटियन्स, हाँगकाँग निवासी व अन्य नागरिकांच्या गटांचा समावेश आहे.

Advertisements

चीन प्रशासनाकडून प्रछन्नपणे तेथील अल्पसंख्य समुदायांचे दमन केले जात आहे. अशा स्थितीत पुढील वर्षी होणाऱया बीजिंग हिवाळी ऑलिम्पिकचे प्रसारण केल्यास प्रसारणकर्त्या कंपन्यांवर चीनशी संगनमत केल्याचा आरोप होऊ शकतो. तसेच चीनकडून होणाऱया मानवधिकारांच्या पायमल्लीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होऊ शकतो, असा दावा यासाठी केला गेला आहे.

सदर मागणीची प्रत एनबीसी युनिव्हर्सल सीईओ जेफ शेल व आणखी काही आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टर्स एक्स्झिक्युटीव्हना पाठवली गेली आहे. पुढील 6 ऑलिम्पिकच्या प्रसारण हक्कासाठी एनबीसी 7.75 अब्ज डॉलर्स अदा करत असून स्वित्झर्लंडस्थित आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक कमिटीशी समन्वयाने ते कार्यरत आहेत. ही रक्कम आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या एकूण उत्पन्नापैकी 40 टक्के इतकी आहे.

आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) ही केवळ एक क्रीडा संघटना असून तिचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी नेहमीच चीनमधील युगुर मुस्लीम, तिबेटी लोक व इतर अल्पसंख्य गटांना दिल्या जाणाऱया वागणुकीचा निषेध करणे टाळले आहे. आयओसीला प्रसारणकर्त्यांना बहिष्कार घालण्याचा इशारा देऊन दबाव आणला आहे. आयओसीच्या 15 प्रायोजकांनी आपल्यावर दबाव असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच काही खेळाडूंनीही त्यांच्या अडचणी कळवल्या आहेत.

बीजिंगमधील हिवाळी ऑलिम्पिक मोजक्या प्रेक्षकांच्या उपस्थितीत होणे अपेक्षित आहे. सदर हिवाळी ऑलिम्पिक चीनमध्ये होऊ नये, यासाठी सातत्याने झालेली मागणी आयओसीने यापूर्वी अनेकदा फेटाळून लावली आहे.

Related Stories

धनंजय फाळकर यांना आज श्रद्धांजली

Omkar B

आठवणी तीन कारसेवेंच्या!

Abhijeet Shinde

उद्धव गीतेची सुरुवात

Patil_p

कुस्तीपटू रवी दहियाची रुपेरी कामगिरी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : ताम्रपर्णी नदीला पूर, बाजार पेठेत शिरले पाणी

Abhijeet Shinde

होय मुख्यमंत्री मला भेटले मात्र स्वगृही बोलावण्याबाबत चर्चा नाही- सुधीर कांदोळकर

Patil_p
error: Content is protected !!