तरुण भारत

पाचव्या कसोटीसाठी मोहम्मद शमी तंदुरुस्त

इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी उद्यापासून, रोहित-पुजाराच्या तंदुरुस्तीकडे लक्

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

आघाडीचा अनुभवी स्पीडस्टर मोहम्मद शमी आता पूर्ण तंदुरुस्त झाला असून तो उद्यापासून (शुक्रवार दि. 10) मँचेस्टरमध्ये खेळवल्या जाणाऱया इंग्लंडविरुद्ध पाचव्या व शेवटच्या कसोटी सामन्यात निवडीसाठी उपलब्ध असणार आहे. यापूर्वी, ओव्हल येथील चौथ्या कसोटी सामन्यात शमी व सहकारी जलद गोलंदाज इशांत शर्मा यांना किरकोळ दुखापतीमुळे विश्रांती दिली गेली. ती लढत भारताने 157 धावांच्या फरकाने जिंकली होती.

शेवटच्या कसोटीला दोन दिवसांचा अवधी बाकी असताना शमी संघाच्या सराव सत्रात सहभागी झाला असल्याचे वृत्त आहे. ‘शमी आता तंदुरुस्त आहे आणि तंदुरुस्त असताना त्याची निवड जवळपास निश्चित असते’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.

शमीची तंदुरुस्ती कर्णधार विराट कोहली व एकमेव उपलब्ध प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्यासाठीही महत्त्वाची मानली जाते. या मालिकेत आतापर्यंत बुमराहने 151 षटके गोलंदाजी केली असून प्रत्येक डावातील त्याची सरासरी गोलंदाजी 21 षटके इतकी आहे. बुमराहच्या खात्यावर या मालिकेत 18 बळी नोंद आहेत. मात्र, टी-20 विश्वचषक स्पर्धा उंबरठय़ावरच असल्याने आणि त्यापूर्वी आयपीएलच्या उत्तरार्धात मुंबई इंडियन्ससाठी बुमराह हाच मुख्य गोलंदाज असल्याने येथे पाचव्या कसोटीत त्याला खेळवले जाणार का, हे पहावे लागेल.

भारतीय संघ इंग्लंडमध्ये 14 वर्षांनंतर मालिका विजयाचे स्वप्न उराशी बाळगून उतरणार असून सर्वोत्तम 11 खेळाडूंचा संघ निवडण्याकडेच व्यवस्थापनाचा कल असेल. पण, याचवेळी गोलंदाजांवरील वर्कलोडचा विचार होणेही महत्त्वाचे असणार आहे.

एखाद्या परिस्थितीत बुमराहला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला गेला तर शमी त्याची जागा घेईल, हे निश्चित असेल. मात्र, भारत मालिका विजयाच्या उंबरठय़ावर असल्याने बुमराहला खेळवण्यावर शिक्कामोर्तब झाले तर सिराजला बाहेर व्हावे लागू शकते. उमेश यादव (सामन्यात 6 बळी) व शार्दुल ठाकुर (2 अर्धशतके व 3 बळी) यांना वगळले जाणार नाही, हे जवळपास निश्चित आहे. तज्ञांच्या मतानुसार, मँचेस्टरची खेळपट्टी जलद गोलंदाजांबरोबरच फिरकी गोलंदाजीला देखील पोषक ठरत आली असल्याने दुसरा फिरकीपटू म्हणून अश्विनला पसंती दिली जाणार का, हे देखील आज स्पष्ट होईल. अश्विनला या मालिकेत आतापर्यंत संधी देण्यात आलेली नाही.

रोहित, पुजाराबाबत….

रोहित शर्मा गुडघ्याच्या दुखापतीने तर चेतेश्वर पुजारा पायाचा घोटा दुखावल्याने येथे खेळू शकणार का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, रोहित पूर्ण तंदुरुस्त होऊ शकेल, असे एकंदरीत चित्र असून वैद्यकीय पथकाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर त्याचा सहभाग निश्चित होईल. रोहित वेळेवर तंदुरुस्त होऊ शकला नाही तर अभिमन्यू ईश्वरन, मयांक अगरवाल व पृथ्वी शॉ असे पर्याय असतील. पुजारा गैरहजर राहिल्यास हनुमा विहारी व सूर्यकुमार यादव यांच्यात चुरस असेल.

Related Stories

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी एस.एस.दास

Patil_p

एफसी गोवा-बेंगलोर लढत बरोबरीत

Omkar B

सेप ब्लॅटरवर फिफाची पुन्हा बंदी

Patil_p

वनडे क्रिकेटबाबत चिंतेचे कारण नाही

Patil_p

‘खेलरत्न’साठी साई प्रणित, श्रीकांत ,कोनेरू हंपीची शिफारस

Amit Kulkarni

क्रिकेटपटू चेतन साकारियाला पितृशोक

Patil_p
error: Content is protected !!