तरुण भारत

गणेशोत्सव साहित्य खरेदीत ‘मेड इन इंडिया’ला अधिक पसंती

प्रतिनिधी/ सातारा

येत्या दोन दिवसानंतर आपल्या लाडक्या बाप्पाचे घरोघरी आगमन होणार आहे.  बाप्पाच्या स्वागताचा उत्साह सर्वत्र दिसू लागला आहे. शहरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या मोती चौक, राजवाडा, बॉम्बे रेस्टॉरेंट, पोवईनाका परिसरात खरेदीसाठी भाविकांची मोठय़ा प्रमाणात गर्दी होते आहे. यंदा विक्रीस ठेवण्यात आलेल्या अधिकतर वस्तु या भारताच बनलेल्या असल्याने ग्राहकांतर्फे ही मेड इन इंडिया साहित्यांनाच पसंती देण्यात येत असल्याचे प्रामुख्याने दिसत आहे.

Advertisements

 गणेशमूर्ती विक्रीची दुकाने थाटलेल्या ठिकाणीदेखील सजावटीचे साहित्य विक्रीसाठी उपलब्ध करून दिले आहे. आरास सजावट नेमकी काय करायची, त्यासाठी नव्या वस्तूंचा किंवा तयार साहित्याचा वापर करायचा, हे नियोजन भाविकांनी करण्यास सुरुवात केली आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रीक साहित्य विक्रीच्या दुकानांमध्ये ही खरेदीदारांची लाईटच्या माळा खरेदी करण्यासाठी गर्दी होत आहे.

 सध्या बाजारात फोमच्या कमानी आरास बनविण्यासाठी विक्री होत आहे. त्यासह गोल मण्यांची माळ, मोत्यांची माळ, चंदन हार, कापडी आणि कागदी फुलांच्या माळा, लटकण यासह लाइट्सचे मोदक यांची मांडणी दुकानदारांनी केली आहे. थर्माकोलला पर्याय म्हणून फोम शीटला मागणी वाढली आहे. फोम शीट महाग असल्याने ग्राहकांकडून कार्डशीट, गोल्डन पेपर, वेलवेट पेपरची मागणी होत आहे. त्याचबरोबर विविध फ्लास्टीच्या आकर्षक अशा फुलांच्या माळा, बेडशीट, मखर यांची मागणी ही मोठय़ा प्रमाणात होत आहे.

 लाखो रूपयांची उलाढाल

लॉकडाऊन उठल्या नंतरचा सर्वाधिक मोठ्ठा उत्सव म्हणजे गणेशोत्सव असल्याने त्याच्या स्वागतासाठी साहित्य खरेदी करीता बाजारपेठेत एकच गर्दी होताना दिसत आहे. एकंदरीत गर्दी पाहता दररोज लाखो रूपयांची उलाढाल होताना दिसत आहे. त्यामुळे व्यापारी वर्गांमध्ये ही सध्या चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

 पुजेच्या साहित्याची मागणी वाढली

 गणेशोत्सवानिमित्त पुजेच्या साहित्याची मागणी ही वाढली आहेत. सध्या बाजारपेठेत कापूर 250 रुपये 250 ग्राम, कंठी 40 रुपयापासून 700 रुपया पर्यंत ,रुमाल 20 रुपयापासून, अगरबत्ती ा 50 रुपयापासून, धूप 400 रुपये किलो, लाकडी पाट 100 रुपयापासून 1000 रुपयापर्यंत विक्री करण्यात येत आहे. त्याचबरोबर सध्या गणरासाठीच्या चांदिच्या दागिण्यांची मागणी ही वाढली आहे. त्यामुळे हे दागिणे खरेदी करण्यासाठी सुवर्णालंकारांच्या दुकानात ग्राहकांची एकच गर्दी पहावयास मिळत आहे.

Related Stories

सातारा जिल्हा परिषदेच्या सभेला सदस्यांनी घरूनच उपस्थिती

Abhijeet Shinde

रेकॉर्डवरील गुन्हेगार तडीपारीच्या रडारवर

Patil_p

आवश्यक महाराष्ट्रातील पहिल्या ’शेतकरी मार्ट’चे कृषी आयुक्तांकडून सातायात उद्घाटन

Omkar B

सातारा जिल्हा बँक चोरी प्रकरणातील चोर सापडला

Abhijeet Shinde

आसमा कुरणे करणार 72 किलोमीटर धावण्याचा विक्रम

Abhijeet Shinde

सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या वादळी पावसामुळे शिये टोलनाक्याची शेड उध्वस्त

Abhijeet Shinde
error: Content is protected !!