तरुण भारत

साताऱ्यात दोन्ही राजेगटांत घमासान

खंदारे-भोसले यांच्यात रणकंदन, सहा जखमी

सातारा/ प्रतिनिधी

Advertisements

साताऱ्यात दोन्ही महाराज यांच्यातील खुन्नस साऱ्या राज्याला माहीत आहे. मात्र शहरात पहिल्यांदाच त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या घमासान मारामारी मुळे शहरात खळबळ माजली. बुधवारी संध्याकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेन्द्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील ऑफिस समोर गाडी लावली आणि त्यातून भडका उडाला असे समजते. दरम्यान, दोन्ही गटांच्या तुफान हाणामारीतून 6 जण गंभीर जखमी झालेत.

स्फोटक असलेल्या या घटनेबाबत, उपस्थित लोकांकडून मिळालेली माहिती अशी की, रात्री आठ सव्वा आठ वाजण्याच्या दरम्यान सनी भोसले हा त्याच्या मित्रांसमवेत दुर्गा पेठेत गेला होता. ज्या ठिकाणी बाळासाहेब खंदारे याचे ऑफिस आहे तिथेच ऑफिस समोर गाडी लावल्याने खंदारे आणि भोसले गटातील कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. या बाचाबाचीचे रूपांतर मारामारी झाली आणि दोन गटांमध्ये उडालेल्या या धुमश्चक्री मुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती.

 या मारामारीत शस्त्रांचा वापर केला गेल्याने सनी भोसले याच्यासह आणखी सहाजण जखमी असल्याचे समजते. सनी भोसले यांच्यासह दोन जखमींना राधिका रस्त्यावरील हॉटेल राजतारा नजीक असलेल्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते त्यामुळे हॉटेल राजतारा हॉस्पिटलच्या परिसरात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते तिथे थांबून होते त्यामुळे तिथेही तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.  काही जखमीना वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

या घटनेमुळे तालीम संघ परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली तोपर्यंत सर्वांची पांगापांग झाली होती मात्र परिसरात तणावाचे वातावरण दिसून येत होते याबाबत रात्री उशिरापर्यंत सातारा शहर पोलीस ठाण्यात कोणाच्याही तक्रारी दाखल झाल्या नव्हत्या त्यामुळे या घटनेची कोणतीही नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती.

रात्री घडलेल्या या दोन गटातील धुमश्चक्रीचे पडसाद  उमटत राहिले. आता पोलिस दलाकडून या सर्व प्रकार लक्ष ठेवण्यात येत होते . या घटनेच्या अनुषंगाने  दोन्ही महाराजांच्या प्रतिक्रिया मिळाल्या नाहीत.

हॉटेल राजतारा परिसरात गर्दी

सातायात दोन्ही राज्यांचे समर्थक एकमेकाला भिडल्याने यामध्ये झालेल्या हाणामारीत जखमी झालेल्या एक-दोघांना हॉटेल राजतारा परिसरातील विघ्नहर्ता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्या परिसरात खासदार उदयनराजे यांचे समर्थक असलेल्या सनी शिंदे गटातील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झालेली होती. रात्री उशिरापर्यंत या परिसरातील वातावरण तणावग्रस्त होते.  दोन राजे गटातील कार्यकर्त्यांच्या या भांडणामुळे निर्माण झालेल्या वातावरणावर पोलीस पोलीस दलाकडून नजर ठेवण्यात येत होती.

Related Stories

कारागृहातील संशयिताकडून पिस्टल घेतले

Amit Kulkarni

तबलिगी जमात कार्यक्रमातील 960 परदेशी काळ्या यादीत

prashant_c

भोसगाच्या माजी सैनिकाचा अपघातात मृत्यू

Patil_p

सातारा : उरमोडी कालवा सल्लागार समिती सदस्यपदी रणजितसिंह देशमुख यांची निवड

datta jadhav

सातारा-पुणे नॉनस्टॉपसाठी नवीन पंधरा बसेस : शेखर चन्ने

datta jadhav

प्रशासक पदावर योग्य व्यक्ती आणि लोकशाही जिंकली

Patil_p
error: Content is protected !!