तरुण भारत

हक्कानीवर बंदी प्रकरणी अमेरिकेला तालिबानची धमकी

काबूल : अफगाणिस्तानातील नव्या काळजीवाहू सरकारवरून अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे. सरकारमध्ये सामील करण्यात आलेल्या लोकांची पार्श्वभूमी विश्वासार्ह नसल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. अमेरिकेच्या या वक्तव्यावर तालिबान भडकला आहे. अशाप्रकारचे वक्तव्य किंवा कुठल्याही प्रकारची बंदी सहन केली जाणार नसल्याचे तालिबानने बजावले आहे. हक्कानी गटाबद्दल अमेरिकेने केलेले वक्तव्य पूर्णपणे दोहा कराराचे उल्लंघन आहे. अशाप्रकारचे विधान अमेरिका किंवा अन्य कुणाच्याच हिताचे नसल्याचे तालिबानकडून म्हटले गेले आहे. हक्कानी परिवार इस्लामिक अमिरातचा हिस्सा आहे. दोहा कराराच्या अंतर्गत इस्लामिक अमिरातच्या सर्व सदस्यांना संयुक्त राष्ट्रसंघ आणि अमेरिकेच्या काळय़ा यादीतून त्वरित हटविण्यात यावे. अमेरिकेने स्वतःच्या धोरणामध्ये बदल करावेत असे तालिबानने बजावले आहे.

Related Stories

सौदी अरेबियाकडून 20 देशांच्या उड्डाणांवर बंदी

datta jadhav

12 वर्षाखालील मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरू

datta jadhav

चीनची बायडन यांच्यावर गलिच्छ टीका

Omkar B

पत्नीकरता तयार केले गोल फिरणारे घर

Patil_p

नेपाळमध्ये 5.8 तीव्रतेचा भूकंप

Patil_p

किम जोंग उन यांना चीनने पाठवली कोरोना लस

datta jadhav
error: Content is protected !!