तरुण भारत

इन्कम टॅक्स रिटर्नसाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाचा निर्णय, ऑडिट रिपोर्ट सादर करण्यासाठीही अधिक कालावधी

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

प्राप्तिकर विवरणपत्र (इन्कम टॅक्स रिटर्न) सादर करण्यासाठी आणखी कालावधीवाढ घोषित करण्यात आली आहे. तांत्रिक अडचणींमुळे विवरणपत्र सादर करण्यास अडचणी येत आहेत. अनेक करदात्यांनी यासंबंधी आक्षेप नोंदविले आहेत. ते लक्षात घेऊन ही कालावधीवाढ देण्यात आली आहे.

व्यक्तीगत प्राप्तिकर विवरणपत्र सादर करण्यासाठीचा शेवटचा दिनांक नियमाप्रमाणे 31 जुलै हा होता. तथापि कोरोना परिस्थिती लक्षात घेऊन तो 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. आता यासाठी आणखी कालावधीवाढ देण्यात आली असून करदाते 31 डिसेंबर 2021 पर्यंत विवरणपत्र सादर करु शकणार आहेत. या निर्णयामुळे कोटय़वधी करदात्यांना दिलासा मिळणार आहे.

हिशेब तपासणी अहवाल (ऑडिट रिपोर्ट) सादर करण्यासाठी नियमानुसार 30 सप्टेंबरपर्यंत कालावधी असतो. मात्र कोरोना परिस्थितीमुळे यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत कालावधी देण्यात आला होता. आता आणखी कालावधीवाढ देण्यात आली असून ती 15 जानेवारी 2022 पर्यंत आहे.

आंतरराष्ट्रीय व्यवहार किंवा विशिष्ट प्रकारचे देशांतर्गत व्यहार करणाऱयांसाठी हिशेब सादर करण्याचा शेवटचा दिनांक नियमाप्रमाणे 31 ऑक्टोबर असतो. तो आधी 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. आता तो 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आल्याची घोषणा करण्यग्नात आली आहे.

रिटर्न ऑफ इनकम सादर करण्यासाठी नियमाप्रमाणे 31 ऑक्टोबर हा शेवटचा दिनांक असतो. तो प्रथम 30 नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला होता. आता तो पुन्हा 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

जे इनकम ऑफ रिटर्न सादर करण्यग्नासाठी नियमाप्रमाणे 30 नोव्हेंबर हा अंतिम  दिनांक होता, तो 31 डिसेंबरपर्यंत वाढविण्यग्नात आला होता. आता आणखी कालावधीवाढ देण्यग्नात आली असून ती 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत आहे.

विलंबाने किंवा सुधारित विवरणपत्रे सादर करण्यासाठी नियमाप्रमाणे 31 डिसेंबरपर्यंत कालावधी असतो. तो प्रथम 31 जानेवारी 2022 पर्यंत वाढविण्यात आला होता. आता तो 31 मार्च 2022 पर्यंत वाढविण्यात आला आहे.

विवरणपत्र प्रकार आणि अंतिम दिनांक

  • विवरणपत्र प्रकार                      अंतिम दिनांक
  • व्यक्तीगत प्राप्तिकर                     31 डिसेंबर 2021
  • ऑडिट अहवाल                         15 जानेवारी 2022
  • आंतरराष्ट्रीय व्यवहार हिशेब        31 जानेवारी 2022
  • रिटर्न ऑफ इनकम                     15 फेब्रुवारी 2022
  • रिटर्न ऑफ इनकम                     28 फेब्रुवारी 2022
  • विलंबित किंवा सुधारित विवरणपत्र            31 मार्च 2022

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 50 लाखांचा टप्पा

datta jadhav

बिहारमध्ये चालली पंतप्रधान मोदींची जादू

Patil_p

रवींद्रनाथ टागोरांच्या ‘त्या’ वास्तुची होणार विक्री; खरेदीसाठी ममता सकारात्मक

Abhijeet Shinde

बजेट 2020 : काय स्वस्त, काय महाग ?

prashant_c

ममता बॅनर्जींचा राज्यपालांना फोन; मतदानावेळी गडबड होत असल्याचा आरोप

Abhijeet Shinde

विद्यार्थ्यांना मारहाण कोणत्या संस्कृतीत बसते?

Patil_p
error: Content is protected !!