तरुण भारत

मालविका बनसोड, गुरबानी उपउपांत्यपूर्व फेरीत

नागपूर : भारताचे बॅडमिंटनपटू मालविका बनसोड आणि रोहन गुरबानी यांनी व्हिक्टर युक्रेन आंतरराष्ट्रीय सिरीज बॅडमिंटन स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला आहे.

चार दिवसांच्या या स्पर्धेत द्वितीय मानांकित मालविका बनसोडने महिला एकेरीच्या सामन्यात युक्रेनच्या प्रोकोपोव्हिचचा 21-14, 21-3 अशा सरळ गेम्समध्ये केवळ 21 मिनिटांच्या कालावधीत पराभव केला. मालविकाचा पुढील फेरीतील सामना अनुपमा उपाध्यायशी होणार आहे. पुरूष एकेरीच्या सामन्यात भारताच्या रोहन गुरबानीने आपल्याच देशाच्या अनिरूद्ध जनार्दनचा 21-7, 21-9 असा पराभव करत पुढील फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत भारताच्या कार्तिकी गुशलनकुमारचे आव्हान मात्र संपुष्टात आले.

Advertisements

Related Stories

सचिन पहिल्या मारुती 800 कारच्या शोधात!

Patil_p

झिंबाब्वेच्या पहिल्या डावात 406 धावा

Patil_p

भारत-पाकिस्तान लढतीत उभय कर्णधारांचा कस लागेल!

Amit Kulkarni

डायमंड लिग सिरीजमध्ये 14 स्पर्धांची शक्यता

Patil_p

वरिष्ठ महिला हॉकीपटूंचे प्रशिक्षण शिबिर आजपासून

Patil_p

विश्वचषक आयोजिण्याचा निर्णय क्रिकेट ऑस्ट्रेलियावर : सचिन तेंडुलकर

Patil_p
error: Content is protected !!