तरुण भारत

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा अफगाणला इशारा

मेलबर्न : तालिबान शासनाने महिलांना क्रिकेट खेळण्यास परवानगी दिली नाही तर पुढील महिन्यात अफगाणच्या पुरूष संघाबरोबर होणाऱया सामन्याचे यजमानपद क्रिकेट ऑस्ट्रेलिया भूषविणार नाही, असा इशारा क्रिकेट ऑस्ट्रेलियातर्फे देण्यात आला आहे.

तालिबानचे सांस्कृतिक आयोगाचे प्रमुख अहमुदुल्ला वासिक यांनी आपले वैयक्तिक मत व्यक्त करताना महिलांना क्रिकेट खेळण्याची जरूरी नसल्याचे म्हटले आहे. वासिक यांच्या या विधानानंतर क्रिकेट क्षेत्राकडे पाहण्याचा तालिबानचा दृष्टीकोन स्पष्ट झाला आहे.

Advertisements

जागतिक क्रिकेट क्षेत्रामध्ये आता महिलांनाही सर्वच ठिकाणी प्राधान्य मिळत असून या क्रीडाप्रकारात पुरूष आणि महिला असे भेदभाव राहिलेले नाहीत, असे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. अफगाण क्रिकेट संघ एकमेव कसोटी सामना खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला जाणार आहे. उभय संघातील हा एकमेव सामना 27 नाव्हेंबरपासून होबार्टमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

Related Stories

भारतीय स्पर्धकांची दुसऱया दिवशीही विजयी घोडदौड

Amit Kulkarni

कसोटी मानांकनात पुजारा सहाव्या स्थानी

Patil_p

मॅक्सवेलला सूर सापडल्याने ऑस्ट्रेलियाला दिलासा

Patil_p

टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंडचा 20 जणांचा संघ

Patil_p

सचिन तेंडुलकर जगातील तिसऱया क्रमांकाचा प्रशंसनीय क्रीडापटू

Patil_p

कोपा अमेरिका स्पर्धेत पेरू उपांत्य फेरीत

Patil_p
error: Content is protected !!