तरुण भारत

भाजपच्या माजी मंत्र्याची गळा आवळून हत्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

उत्तरप्रदेशातील भाजपा नेते आणि माजी मंत्री आत्माराम तोमर यांची राहत्या घरी टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी हा प्रकार समोर आला असून, पोलिसांनी तोमर यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

Advertisements

मिळालेल्या माहितीनुसार, आत्माराम तोमर यांचे बडौतच्या बिजरौल रोड येथे निवासस्थान आहे. याच निवासस्थानी त्यांची टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आली आहे. आज सकाळी तोमर यांचा ड्रायव्हर विजय तोमर यांच्या घरी आला असता घराचा दरवाजा आतून बंद होता. कारही घराबाहेर नव्हती. त्यामुळे ड्रायव्हरला शंका आल्याने त्याने घराचा दरवाजा तोडला. त्यावेळी तोमर मृतावस्थेत आढळले. ड्रायव्हरने याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, तोमर यांच्या हत्येबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही.

तोमर 1993 साली छपरौली विधानसभा मतदार संघातून भाजपाच्या तिकीटावर निवडून आले होते. 1997 साली भाजपाने त्यांना मंत्रिपद दिले होते. ते जनता वैदिक कॉलेजचे मुख्य प्राध्यापक देखील राहिले आहेत.

Related Stories

थिएटर्स उघडणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

datta jadhav

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav

पावसामुळे देहरादून-ऋषिकेश दरम्यानचा पूल तुटल्याने गाड्या गेल्या वाहून

Abhijeet Shinde

लोकांना हवी होती ‘ममता’ पण मिळाली ‘निर्ममता’

Patil_p

‘हरियाणा फ्रेश’ नावाने बॉटल बंद पाणी तयार करणार सरकार

Rohan_P

रेशनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई : छगन भुजबळ

prashant_c
error: Content is protected !!