तरुण भारत

“मौका सभी को मिलता है,” – नितेश राणेंचा इशारा

ऑनलाईन टीम / मुंबई

डीएचएफएल’ कर्ज प्रकरणी केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि आमदार नितेश राणे यांना पुणे पोलीसांनी लुकआउट सर्क्यूलर जारी करत कंपनीकडून कर्ज रुपात घेतलेले 65 कोटी रुपये थकवल्याप्रकरणी पुणे पोलीसांनी राणे कुटुंबियांना सर्क्यूलर पाठवले आहे. यामध्ये आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडने २५ कोटींचं कर्ज दिले होते. तर नीलम राणे या आर्टलाईन प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेडच्या सहअर्जदार होत्या. यावर दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनी कडून पुणे पोलीसात तक्रार दाखल केली आहे. यावर आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर सत्या चित्रपटातील “मौका सभी को मिलता है” असा डायलॉग शेअर करत विरोधकांना इशारा थेट इशारा दिला आहे.

Advertisementsपुढे राणे यांनी आपल्याला जाणीवपुर्वक त्रास दिला जात असल्याचं नमुद करत हे सर्क्युलर कोण काढलं यावर बोलताना ते म्हणाले की, “सर्क्यूलर कुणी काढलं हे ठाकरे सरकारला विचारा. महाविकास आघाडी सरकारची आम्ही झोप उडवली आहे. तसेच यापुढे महाविकास आघाडीचे सगळे भ्रष्टाचार बाहेर निघणार आहेत. हे येत्या दिवसात आपल्याला कळेलच तसेच लुकआउट नोटिस बद्दल आम्ही थेट सर्वाच्च न्यायालयातच बोलू या शी आमचा काहीही संबंध नाही. असे ही ते म्हणाले या आशयाचे नितेश राणे यांनी ट्विट देखील केले आहे. यामूळे आता राणे विरुद्ध महाविकास आघाडी अशी नकळत आमने सामने येत आरोप – प्रत्यारोप होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत.

Related Stories

कौटुंबिक वादातून युवकांचा आत्महतेचा प्रयत्न

Patil_p

वाढदिवस साजरा करू नका; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

Rohan_P

सरन्यायाधीशपदी एन. व्ही. रमण शपथबद्ध

Patil_p

बदली कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपातून नोकरी द्यावी – मडावी

Abhijeet Shinde

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना डिस्चार्ज

prashant_c

काँग्रेस उमेदवाराचे कोरोनामुळे निधन

Patil_p
error: Content is protected !!