तरुण भारत

प्रियांका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात

नवी दिल्ली /प्रतिनिधी

देशात आगामी ५ राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत.त्यामुळे आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच पक्षांनी कम्बर कसली आहे. दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, काँग्रेस, बसपासह सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. पक्षाचा प्रचार करण्यासाठी जास्तीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी सर्व पक्ष विविध प्रकारे प्रयत्न करत आहेत. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी मैदानात उतरल्या आहेत. त्या उत्तर प्रदेशमधील गावं आणि शहरांमधून तब्बल १२ हजार किलोमीटरची यात्रा करणार आहेत. काँग्रेसला नवसंजीवनी देण्यासाठी प्रशांत किशोरही काँग्रेस सोबत असणार आहेत. ते गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल आणि प्रियांका गांधी यांना भेटले होते. तसेच त्यांना पक्षात घेण्याच्या हालचालीही सुरु आहेत.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेश काँग्रेसच्या तयारीचा प्रियंका गांधी आपल्या दोन दिवसीय लखनऊ दौऱ्यात आढावा घेत आहेत. शिवाय, निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा देखील करत आहेत. तसेच उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी प्रियांका गांधी स्वतः मैदानात उतरून १२ हजार किमीची यात्रा काढणार आहेत. त्यामुळे प्रियांका गांधी यांचा पक्षाला कितपत फायदा होईल हा येणारा काळच सांगेल.

Advertisements

Related Stories

लडाख सीमेवर आणखी भारतीय सैनिक नियुक्त

Patil_p

ऑक्सफर्ड विद्यापीठाने कोरोना लसीची मानवी चाचणी थांबवली

datta jadhav

उत्तर प्रदेशात 13 जुलै पर्यंत कडक लॉक डाऊन

Rohan_P

पश्चिम बंगालला ‘यास’ चक्रीवादळाचा तडाखा; ममता बॅनर्जी म्हणाल्या…

Rohan_P

लाल किल्ला हिंसाचार : दीप सिद्धूसह चौघांवर 1 लाखाचे बक्षीस

datta jadhav

महाराष्ट्र : खासगी बसेस आता पूर्ण क्षमतेने धावणार; मार्गदर्शक सूचना जारी

Rohan_P
error: Content is protected !!