तरुण भारत

सांगली : इस्लामपुरातील बंडया कुटे गँग’ला मोक्का

कृष्णात पिंगळे यांची माहिती : इस्लामपूर मोक्का न्यायालयात दोषारोप पत्र दाखल

शहरातील सातवा तर तालुक्यातील आठवा मोक्का

इस्लामपूर : प्रतिनिधी

Advertisements

येथील कापूसखेड रस्त्यावरील ओसवाल यांच्या मोकळया प्लॉटींगच्या जागेत राजेश सुभाष काळे (वय-३५, मुळ रा.बावची, सध्या नेहरुनगर इस्लामपूर) या सेंट्रींग मजुराचा दगडाने ठेचून निर्घुण खून केल्या प्रकरणातील संदीप उर्फ बंडया कुटे गँगवर मोक्कातंर्गत कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपाधिक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिली.

संदीप शिवाजी कुटे (वय-२२,रा.लोणारगल्ली, इस्लामपूर), ऋतिक दिनकर महापूरे (२१,खांबेमळा,इस्लामपूर), अनिल गणेश राठोड (२६, रा. लोणारगल्ली, इस्लामपूर, मुळ रा.ऐनापूर, (एल.टी) विजापूर) अशी मोक्कातंर्गत कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत. अप्पर पोलीस महासंचालक डॉ.राजेंद्र सिंग यांची अंतिम मंजूरी घेवून मोक्का न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. शहरातील हा ७ वा तर तालुक्यातील हा ८ वा मोक्का आहे, असे पिंगळे यांनी सांगितले.

काळे हा एका सेट्रींग ठेकेदाराकडे मजूर म्हणून काम करीत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दि.८ मार्च रोजी रात्री आठ वाजून ४२ मिनिटांनी तो कोल्हापूर नाक्यावरील चव्हाण कॉर्नरवर उतरून दारु पिऊन बाहेर पडला. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिघे आरोपी मद्यप्राशन करुन एका दुचाकीवरुन या दारुच्या दुकानाजवळ आले. त्यांनी काळे याचे खिसे चापचून लूटीचा प्रयत्न केला. दरम्यान भरवस्तीत दंगा होईल, म्हणून त्यांनी त्याला स्वत:च्या दुचाकीवर घेवून आर्या पान शॉप, डांगे इंटरनॅशनल स्कुल, टकलाईनगर मार्गे कापूसखेड रस्त्या लगतच्या ओसवाल यांनी विकसित केलेल्या प्लॉटींगमध्ये नेवून त्याची पॅट काढून आणखी पैसे आहेत का, पाहिले. त्याच वेळी संशयीत आरोपी कुटे याने त्याच्या डोक्यात रॉडने हल्ला केला. त्यावेळी काळे हा जीव वाचवण्यासाठी पळाला. काही अंतर पाठलाग करुन त्याच्या चेहऱ्यावर व डोक्यात दगड घालून निर्घुण खून केला.

पोलिसांनी ठिकठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर अनेक ठिकाणी एकाच दुचाकीवरुन तिघे जात असल्याचे आढळून आले. त्यावरून हे तिघे हाती लागले. कारवाई झालेले आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. या तिघा आरोपींविरुध्द मोक्कातंर्गत कारवाई करून त्या गुन्हयाच्या तपासात आरोपी विरुध्द तांत्रिक व परस्थितीजन्य पुरावा मिळाल्याने या गुन्हयात अप्पर पोलीस महासंचालक डॉ.राजेंद्र सिंग यांची अंतिम मंजूरी घेवून मोक्का न्यायालय इस्लामपूर यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस अधिक्षक दिक्षीत गेडाम, अप्पर पोलीस अधिक्षक मनिषा दुबुले यांच्यामार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे, पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी कारवाई केली. या गुन्हयाच्या तपासामध्ये हेड कॉन्स्टेबल संदीप सावंत यांनी मदत केली.

Related Stories

सांगली जिल्ह्यात नवे 277 रुग्ण, तर 546 कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी सांगली जिल्हा भाजपाच्यावतीने निदर्शने

Abhijeet Shinde

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी जनतेने नियमांचे पालन करावे- राज्यमंत्री कदम

Abhijeet Shinde

मिरज शासकीय रुग्णालयात कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या

Abhijeet Shinde

कुंडल येथे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रांताधिकाऱ्यांची कारवाई

Abhijeet Shinde

सांगली : मार्चअखेर जिल्ह्यात 2109 कोटींचे पीक कर्ज वाटप

Abhijeet Shinde
error: Content is protected !!