तरुण भारत

तालिबान्यांनी गाठला क्रूरतेचा कळस; रोहुल्लाह सालेह यांची फरफट करत घातल्या गोळ्या

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

अफगाणिस्थानवर सत्ता प्रस्तापित करत तालिबानने नागरिकांवर चांगलीच दहशत निर्माण केली आहे. अफगाणिस्थान मधील महिलांनी यापुर्वीच्या अनुभवावरुन निष्ठूर वागणुकीची शंका बऱ्याचदा प्रसारमाध्यमांसमोर बोलुन दाखवली होती. यावर तालिबानच्या प्रवक्त्याने एका महिला अँकरला दिलेल्या मुलाखतीत तालिबान आता नागरिकांना योग्य ती वागणूक देणार आहे. अशा आशयाची माहिती दिली होती. मात्र आता तालिबान कडून घडणारी क्रूरता पाहता. अफगाणिस्थान मधील महिलांनी व्यक्त केलेली शंका खरी ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.

कारण तालिबान्यांनी क्रूरतेचा कळस गाठला आहे. अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्राध्यक्ष आणि स्वत:ला राष्ट्राध्यक्ष घोषित करणारे अमरुल्ला सालेह यांच्या भाऊ रोहुल्लाह सालेह याला नग्न करुन मारहाण केली आहे. या नंतर गोळ्या घालुन तालिबान्यांनी ठार केल्याची माहिती समोर आली आहे. यानिमित्ताने पंजशीरमधील सत्ता संघर्ष अद्याप ही तसाच धगघगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याच संघर्षादरम्यान अमरुल्ला सालेह यांचा भाऊ रोहुल्लाह सालेह ठार झाला आहे. तालिबानने रोहुल्लाह सालेहची ओळख पटल्यानंतर त्याला नग्न करुन मारहाण केली आणि नंतर गळा कापत गोळ्या घातल्या असल्याचे एका इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीतून स्पष्ट झाले आहे.

Advertisements

Related Stories

कोरोना नियंत्रणामुळे रेल्वे फेऱ्यांमध्ये वाढ

Patil_p

आसाममध्ये दिसली दुर्लभ पांढरी हरिण

Patil_p

लसीसाठी तीन-चार महिन्यांची प्रतीक्षा

Patil_p

मंत्री मुश्रीफांचे येत्या आठवडय़ातील सर्व कार्यक्रम रद्द

Abhijeet Shinde

ट्रक खरेदी व्यवहारात फसवणूक

Patil_p

कोरोना संपवायचाय अन जगायचंय पण..

Patil_p
error: Content is protected !!