तरुण भारत

तडीपारीच्या आदेशाचा भंग; आरोपी अटकेत

सातारा / प्रतिनिधी :

सैदापूर येथील आरोपी अर्जुन नागराज गोसावी याला सातारा जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. तरीही तो आदेशाचा भंग करत सैदापूर येथील राहत्या घराच्या परिसरात वावरत होता. यामुळे सातारा तालुका पोलीसांच्या डीबी पथकाने त्याला अटक करून गुन्हा दाखल केला.

Advertisements

याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहिती अशी की, गोसावी वस्तीतील आरोपी अर्जुन नागराज गोसावी याला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. तरीही हा सैदापुर वस्तीत फिरत आहे. अशी माहिती डीबी पथकाला मिळाली. डीबी पथकाने शुक्रवारी सैदापूर वस्तीत छापा टाकून अर्जुन गोसावी याला अटक केली. तसेच तडीपारीच्या आदेशाचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

जिह्यात अद्याप विकेंड लॉकडाऊन कायम

Patil_p

राष्ट्रीय आंतरशालेय स्पर्धेत तनिशचे यश

Patil_p

कृष्णा हॉस्पिटलमधून 23 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज

Patil_p

औंध ऐतिहासिक पद्माळे तळे झाले फुल्ल

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 283 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज तर 672 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

लसीकरण केंद्रावर उडला गोंधळ

Patil_p
error: Content is protected !!