तरुण भारत

सोलापूर : दुधनीत जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा

साडे आठ लाखाच्या मुद्देमालासह १८ जणांवर कारवाई

प्रतिनिधी / अक्कलकोट

Advertisements

अक्कलकोट तालुक्यातील दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुधनी येथील शांभवी हॉटेलच्या शेजारी असलेल्या बालाजी चित्र मंदिरच्या पॅसेजमध्ये मन्ना नावाचा जुगार खेळताना अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याने छापा टाकून ८ लाख ४२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून १८ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.ही घटना दि १० रोजी सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत चालू होते. यामध्ये १५ जणांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, दुधनी ता अक्कलकोट येथे शांभवी हॉटेलच्या शेजारी असलेल्या बालाजी चित्र मंदिरच्या पॅसेजमध्ये पैशावर पैज लावून मन्ना नावाचा जुगार खेळताना अक्कलकोट पोलीस ठाण्याच्या वतीने अचानक धाड टाकले यामध्ये १८ जण जुगार खेळताना सापडले.यामध्ये आरोपींच्या अंगझडतीत १ लाख १२५० रुपये रोख, १ लाख ६,५०० मोबाईल फोन व जुगार साहित्य आणि ६ लाख ३६ हजार रुपये किंमतीचे वाहन असे एकूण ८ लाख ४२ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

यामधील अक्कलकोट, अफजलपूर व सिंदगी तालुक्यातील एकूण १८ आरोपी आहेत.या घटनेची फिर्याद पोलीस नाईक नबीलाल मियाँवाले यांनी दिली असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याचे काम चालू होते. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अजय भोसले, आशपाक मियावाले, संजय जाधव,श्रीकांत चव्हाण यांच्यासह इतर कर्मचाऱ्यानी केली.

Related Stories

उत्तम नागरिक ही भारताची सर्वात मोठी गरज : डॉ.अ.ल. देशमुख

prashant_c

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विकिपीडिया कार्यशाळा

prashant_c

सोलापूर : सराईत गुन्हेगारानेच केला सराईत गुन्हेगाराचा खून

Abhijeet Shinde

सोलापूर : ‘रस्ते अपघातांची संख्या कमी करण्यासाठी ब्ल्यू प्रिंट तयार करा’

Abhijeet Shinde

सोलापूर : नेत्यांची मुले सुरक्षित तर जनता असुरक्षित

Abhijeet Shinde

सोलापूर ग्रामीणमध्ये आज 152 नवे कोरोनाबाधित

Abhijeet Shinde
error: Content is protected !!