तरुण भारत

भोंदूबाबा मनोहर भोसले याला पाच दिवसांची पोलिस कोठडी

प्रतिनिधी / करमाळा

करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील अटकेत असलेला भोंदूबाबा मनोहर भोसले याला बारामती न्यायालयाने 16 सप्टेंबरपर्यंत (पाच दिवस) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. संत श्री बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी त्याच्यावर बारामती पोलिसात गुन्हा दाखल झालेला असून शुक्रवारी त्याला अटक केलेली आहे. शनिवारी (ता. ११) भोसलेला न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. भोसलेवर करमाळा पोलिसात बलात्काराचा गुन्हा दाखल आहे.

बारामती पोलिसांनी भोसलेला शुक्रवारी सातारा जिल्ह्यातील सालपे येथील एका फार्म हाऊसवर ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यानंतर शनिवारी त्याला न्यायाधिशांपुढे पोलिसांनी हजर केले. बारामती तालुक्यातील शशिकांत सुभाष खऱात याने मनोहर भोसले यानी फसवणूक केली असल्याची फिर्याद दिली होती त्यावरून गुरुवारी (ता. ९) त्याच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्याच दिवशी करमाळा पोलिसातही एका महिलेच्या फिर्यादीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला अटक करण्यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. विशाल हिरे व पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तीन पथके रवाना झाली होती.

कॅन्सर बरा करतो म्हणून अडीच लाख उकळल्याप्रकरणी अटकेत असलेला भोसले प्रचंड तणावाखाली गेला आहे. मी बदनाम झालो आहे. मला जेलमधून सोडू नका. माझा शेवट जेलमध्येच करा. मला जगायचे नाही. अशी उद्‌वेगाची भाषा भोसले हा अटकेनंतर बोलत आहे. भोसले याने गुन्ह्यात वापरलेली गाडी ताब्यात घेणे, फिर्यादीकडून उकळलेले अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे उर्वरित दोन आरोपींना अटक करणे बाकी आहे, असे पोलिसांचे म्हणणे प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. जे. गिरे यांनी मान्य करत भोसले याला पोलिस कोठडी दिल्याचे अधिकारी ढवाण यांनी सांगितले. सरकारी पक्षाची बाजू अॅड. सुरेश सोनवणे यांनी न्यायालयात बाजू मांडली, तर आरोपी भोसले याच्या वतीने अॅड. विजय ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. 

Advertisements

Related Stories

वाई तालुक्यात जांभळीकरांनी मोडले एकाच दिवसात रेकॉर्ड

Patil_p

कोल्हापूर : पावसाचा जोर ओसरला,पूरस्थिती कायम

Abhijeet Shinde

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अकुशल दिव्यांगांना रोजगार हमीचा लाभ

Abhijeet Shinde

हेळव्यांची चोपडी म्हणजे वंशावळीचे ‘डाटा सेंटर’

Abhijeet Shinde

कास धरणाचे काम ग्रामस्थांनी पाडले बंद

Patil_p

दिवाळी अंकातून तरुण भारत’ने वाचकांची अभिरूची वाढविण्याचे काम केले – प्र-कुलगुरू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!