तरुण भारत

न्यूझीलंडचा बांगलादेशवर 27 धावांनी विजय

वृत्तसंस्था/ ढाक्का

पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील येथे खेळविण्यात आलेल्या शेवटच्या सामन्यात न्यूझीलंडने यजमान बांगलादेशचा 27 धावांनी पराभव केला. पण बांगलादेशने ही मालिका 3-2 अशा फरकानी यापूर्वीच जिंकली आहे.

Advertisements

या शेवटच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 162 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकांत 8 बाद 134 धावापर्यंत मजल मारल्याने त्यांना हा सामना 27 धावांनी गमवावा लागला.

न्यूझालंडच्या डावात फिन ऍलनने 41 तर लेथमने नाबाद 50 धावा झोडपल्या. ऍलन आणि रविंद्र यांनी 34 चेंडूत 58 धावांची भर घातली. ऍलनने 24 चेंडूत 41 धावा झोडपल्या. बांगलादेशच्या शौरीफूलने ऍलन आणि रविंद्र यांना बाद केले. निकोल्स आणि लेथम यांनी पाचव्या गडय़ासाठी 35 धावांची भर घातल्याने न्यूझीलंडने 162 धावांपर्यंत मजल मारली. बांगलादेशच्या शौरीफूलने 48 धावांत 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या डावात मेहमुदुल्लाने 23 धावा जमविल्या. न्यूझीलंडचा गोलंदाज अजीज पटेलने बांगलादेशच्या दास आणि नुरूल हसन यांचे बळी मिळविले. अतिफ आणि मेहमुदुल्ला यांनी 63 धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडच्या पटेलने या मालिकेत सर्वाधिक म्हणजे 10 बळी मिळविले आहेत. या शेवटच्या सामन्यात त्याने दोन गडी बाद केले.

Related Stories

हॉकी संघ पूर्ण फिटनेस गाठण्याच्या मार्गावर : रीड

Patil_p

नेदरलँड्सची उपउपांत्यपूर्व फेरीत धडक

Patil_p

मुंबईचा इंडियन्सचा ‘तो’ व्हीडिओ काय सांगतो?

Patil_p

ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

Omkar B

भरत अरुण केकेआरच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी

Patil_p

एक पाऊल पुढे टाकण्याचे दिल्ली कॅपिटल्सचे ध्येय ः कैफ

Patil_p
error: Content is protected !!