तरुण भारत

रितिका श्रोत्री आणि विनायक माळी झाले ‘मॅड’

युथ… या शब्दातच एक वेगळी एनर्जी आहे. तारुण्यात एक वेगळाच मॅडनेस प्रत्येकात भरलेला असतो. या मॅडनेसमधूनच कधी कधी कल्पनेपलीकडच्या अतर्क्य गोष्टी घडत असतात. असाच अतर्क्य असलेला ‘मॅड’ हा युथफूल, कलरफूल आणि रोमँटिक कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी येतोय. 2022मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होईल.

मॅडनेस जगण्यात एक कैफ असतो…. हा मॅडनेस तुम्हाला काही मिळवून देऊ शकतो किंवा गोत्यात ही आणू शकतो. वेडेपणाची हीच तुफानी झिंग घेऊन लेखक समीर आशा पाटील आणि दिग्दर्शक निखिल वि. खजिनदार प्रेक्षकांना मॅड करायला सज्ज झाले आहेत. नुकतेच या चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले आहे. या मोशन पोस्टरमधून त्यांच्या अफाट मॅडनेसची कल्पना येते.

Advertisements

या चित्रपटाच्या निमित्ताने हटके आणि प्रेश जोड़ी प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अल्पावधीतच आपल्या उत्तम अभिनय कौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केलेला विनायक माळी ऊर्फ दादूस यांची रोमँटिक सफर मॅड या चित्रपटातून अनुभवता येणार आहे. विनायक माळी वेगळय़ाच अतरंगी अंदाजात ह्या चित्रपटातून रूपेरी पडद्यावर पदार्पण करणार आहे. ठसकेबाज लव्हेबल रितिका श्रोत्री आणि अतरंगी विनायक माळी हे भन्नाट समीकरण चित्रपटाची रंगत चांगलीच वाढवतील हे नक्की. रितिका श्रोत्री आणि विनायक माळी यांच्या या मॅडनेसची मॅड रोलर कोस्टर राइड प्रेक्षकांसाठी मजेशीर असणार आहे.

Related Stories

ज्युनिअर एनटीआरसोबत झळकणार जान्हवी कपूर

Omkar B

ऑस्करविजेते ख्रिस्तोफर प्लमर कालवश

Patil_p

दिग्पाल लांजेकरने उचलले ‘शेर शिवराज है’ चे शिवधनुष्य

datta jadhav

80 वर्षांच्या आजोबांची भूमिका साकारणं आव्हानात्मक : दिलीप प्रभावळकर

Patil_p

मैदानात हुकलेली सिक्सर हर्षदने अभिनयात मारली

Patil_p

कियाराचे फॅशन सेन्स

tarunbharat
error: Content is protected !!