तरुण भारत

आदर्श शिंदेच्या आवाजात घुमणार ‘हे गणराया’

गणेशभक्तांच्या भेटीस दरवर्षी नवनवीन गाणी येतच असतात, यातच भर घालत ‘हे गणराया’ हे नव्या धाटणीचे गाणे निर्माते अँजेला आणि तेजस भालेराव गणपती बाप्पांच्या भेटीसाठी घेऊन आले आहेत. पीबीए म्युझिक अंतर्गत हे गाणे नुकतेच मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याची विशेष बाब म्हणजे हे गाणे आदर्श शिंदे आणि श्रावणी महाजन यांनी संगीतबद्ध केले आहे. गीतकार संग्राम पाटील आणि मयुरेश शिंदे यांनी हे गाणं लिहिले असून या गाण्याच्या संगीताची आणि दिग्दर्शनाची जबाबदारी मयुरेशने उत्तमरीत्या पेलवली आहे. तर क्रिएटिव्ह हेड म्हणून वैभव लोंढे यांनी काम पाहिले आहे.  इंस्टाग्रामवरील काही फेमस कलाकार आरजे सुमित, अभि रोकडे, अनिकेत शिंदे, विवेक तलवार, निखिल वाघ, हर्षदा वाघ, विवेक केसरकर,दुर्वा साळोखे,श्वेता भारगुडे यांनी या गाण्याला उत्तम साथ दिली.

Related Stories

‘अवांछित’ मधून पश्चिम बंगालच्या सौंदर्याची भुरळ मराठी प्रेक्षकांवर

Rohan_P

कंगना रानौतच्या सुरक्षेबाबत हिमाचल प्रदेश सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

अभिनेता संजय दत्तला रुग्णालयातून डिस्चार्ज

Rohan_P

भावेश पाटील यांच्या दिग्दर्शकीय कौशल्याचे रहस्य

Patil_p

सान्याने 14.3 कोटी खरेदी केले घर

Amit Kulkarni

फेमिनाच्या सर्वोत्तम महिलांच्या यादीत सामंथा

Patil_p
error: Content is protected !!