तरुण भारत

सोनं पावलांनी आली गौराई..!

पारंपरिक पद्धतीने गौरीचे स्वागत : महिला-युवतींमध्ये उत्साहाचे वातावरण

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

गणेशोत्सवातील गौराईचे स्वागत हा सोहळा अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. शुक्रवारी गणरायाचे आगमन झाल्यानंतर रविवारी सकाळपासून गौराईला आपल्या घरी विराजमान करण्यासाठी महिलांची लगबग सुरू होती. विहीर, तलाव अथवा मंदिरांशेजारीच गौराईचे पूजन करुन तेथून घरी सोनं पावलांनी गौराईला घरी नेण्याचा विधी पार पडला. कुमारीका तसेच सुवासिनींच्या हस्ते गौराईचे सोनं पावलांनी घरात पूजन करण्यात आले. त्यामुळे महिलांसह युवतीमध्ये उत्साह संचारल्याचे पहायला मिळाले.

गौरीच्या स्वागतासाठी गेल्या दोन दिवसांपासून बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी  झाली होती. आकर्षक मुखवटय़ांना विशेष मागणी असल्याचे दिसून आले. रविवारी सकाळपासून महिला व युवती गौरीच्या स्वागताची तयारी करत होत्या. गौराईचे विधीवत पूजा व औक्षण करून स्वागत करण्यात येत होते.

सासरी गेलेल्या मुलीचे माहेरी येताच ज्याप्रमाणे स्वागत होते, त्याचप्रमाणे गौरीचे स्वागत करण्याची परंपरा जोपासली जाते. रविवारी आलेल्या गौरीचे सोमवारी आणि मंगळवारी पूजन होणार आहे. यानंतर गणराया सोबत विसर्जन होणार आहे.

Related Stories

न्यायालय आवारातच व्हिडिओद्वारे पक्षकारांची घेतली साक्ष

Patil_p

टिळकवाडीतील पेव्हर्सच्या अर्धवट रस्त्यांमुळे रहिवाशांना त्रास

Patil_p

सिव्हिलमध्ये 20 जण आयसीयुमध्ये

Patil_p

मिस्टर इंडिया शरीरसौष्टव स्पर्धेसाठी कर्नाटक संघाची निवड

Amit Kulkarni

गतमहिन्यात 1930 जणांनी उडविला लग्नाचा बार

Amit Kulkarni

केएलई व गृहरक्षक दलाच्यावतीने कामगारांना मदत

Patil_p
error: Content is protected !!