तरुण भारत

फॅब इंडियातील हिस्सेदारी विकणार उद्योगपती प्रेमजी

चालू आर्थिक वर्षात आयपीओ आणणार, सेबीकडे अर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisements

कपडय़ांच्या क्षेत्रात विपेती कंपनी फॅब इंडियातील आपली हिस्सेदारी अझीम प्रेमजी विकणार असल्याचे समजते. आपली काहीशी हिस्सेदारी प्रेमजी विकतील, असे सांगितले जातेय. दरम्यान, फॅब इंडिया आपला आयपीओ आणणार असून त्याकरिता नोव्हेंबरपर्यंत कंपनी सेबीकडे मंजुरीकरीताची सर्व ती कागदपत्रे सादर करेल. त्यानंतर 1 ते 2 महिन्यात सेबीकडून आयपीओला मंजुरी मिळू शकेल. सदरचा आयपीओ चालू आर्थिक वर्षात भारतीय भांडवली बाजारात दाखल होण्याची शक्मयता सांगितली जात आहे. सदरच्या आयपीओतून 1 अब्ज डॉलर्सची उभारणी केली जाणार आहे. आपल्या आयपीओ व्यवस्थापनासाठी कंपनी एसबीआय कॅपिटल मार्केट्स, आयसीआयसीआय सिक्मयुरिटीज व जेपी मॉर्गन यांच्यासह इतर गुंतवणूक बँकांसोबत चर्चा करते आहे.

प्रेमजी-निलेकणींची हिस्सेदारी

कंपनीमार्फत आयपीओतून 25 ते 30 टक्के हिस्सेदारी विकली जाऊ शकते. समभागधारक उद्योगपती अझीम प्रेमजी काही टक्के हिस्सेदारी विकू शकतात. आयटी क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी व त्यांच्या पत्नी रोहिणी निलेकणी हेही कंपनीचे समभागधारक गुंतवणूकार आहेत.

Related Stories

50 टक्के स्टार्टअप्सपुढे समस्यांचे जाळे

Patil_p

नोकियाचे स्मार्ट टीव्ही दाखल

Omkar B

दुसऱया दिवशी शेअर बाजार तेजीतच

Patil_p

टोयोटा उत्पादनात करणार घट

Patil_p

आर्थिक क्षेत्रांच्या बळकटीसाठी 9 लाख कोटीचे सहाय्य आवश्यक

Patil_p

रिलायन्सने केली 150 अब्ज अमेरिकन डॉलर्सची कमाई

datta jadhav
error: Content is protected !!