तरुण भारत

शेअर बाजारावर दबावाचे सावट, घसरणीसह बंद

सेन्सेक्समध्ये 127 तर निफ्टीत 13 अंकांची घसरण – रिलायन्स नुकसानीत

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisements

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी भारतीय शेअर बाजार हा काहीसा कमकुवत होत बंद झाल्याचा पाहायला मिळाला. जागतिक स्तरावरील नकारात्मकतेचा परिणाम बाजारावर दिसला. सोमवारी रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग नुकसानीत होते.

सोमवारी सरतेशेवटी सेन्सेक्स निर्देशांक 127 अंकांच्या घसरणीसह 58,177.76 तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 13 अंकांच्या घसरणीसह 17,355.30 अंकांवर बंद झाला होता. विक्रीच्या दबावाखाली रिलायनस इंडस्ट्रिजचे समभाग 2 टक्क्यापर्यंत घसरलेले पाहायला मिळाले.

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराची सुरूवात घसरणीसह झाली. सेन्सेक्स निर्देशांक 58,262 अंकांवर तर निफ्टी 17363 अंकांवर खुला झाला. दुपारच्या सत्रात सेन्सेक्स निर्देशांक 190 अंकांनी आणि निफ्टी 40 अंकांनी घसरण नोंदवत व्यवहार करत होता. सेन्सेक्समधील 30 पैकी 12 समभाग तेजीसह आणि 18 समभाग घसरणीसह व्यवहार करताना दिसले. यात रिलायन्स इंडस्ट्रिजचे समभाग 2 टक्के आणि आयसीआयसीआय बँकेचे समभाग 1 टक्के इतके घसरणीत होते. आयटी क्षेत्रातील कंपनी टीसीएसचे समभाग मात्र 1 टक्के वाढीसह कार्यरत होते. हिंडाल्को, भारती एअरटेल, विप्रो यांचे समभागही तेजी दर्शवत होते. तर दुसरीकडे महिंद्रा आणि महिंद्रा, अदानी पोर्टस् तसेच हिंदुस्थान युनिलिव्हरचे समभाग मात्र नुकसानीत होते. निफ्टी बँक निर्देशांक मात्र 0.58 टक्के इतका घसरला होता.

बीएसईवर 3300 समभागांमध्ये व्यवहार होत होता. ज्यात 1602 समभाग तेजीसह कार्यरत होते. यासोबत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे बाजार मूल्य 255 लाख कोटी रुपयांवर पोहचले होते. याआधी मागच्या आठवडय़ात शेअर बाजारात फक्त चारच दिवस काम झाले होते. शुक्रवारी गणेश चतुर्थीची बाजाराला सुट्टी होती. गुरुवारी सरतेशेवटी शेअर बाजारात सेन्सेक्स निर्देशांक 55 अंक वाढीसह 58,305 वर तर निफ्टी निर्देशांक 16 अंकांच्या वाढीसह 17,369 अंकांवर स्थिरावला होता. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया 18 पैसे इतका कमकुवत होऊन 73.68 वर होता. 

Related Stories

इन्फोसिसचा महसूल 12 टक्क्यांनी वधारला

Patil_p

देशामध्ये नवीन आठ खासगी बँका होणार सुरू

Patil_p

देवयानी इंटरनॅशनलचा येणार आयपीओ

Patil_p

विमान प्रवाशांची संख्या निम्मीच विमान सेवेत मात्र सुधारणा

Patil_p

सेन्सेक्स गडगडला

tarunbharat

जिओच्या पोस्टपेड ग्राहकांसाठी सिक्युरिटी डिपॉझिट आवश्यक

Patil_p
error: Content is protected !!