तरुण भारत

बोलली जाणारी प्रत्येक भाषा ‘ईश्वरीय’

मद्रास उच्च न्यायालयाची टिप्पणी

वृत्तसंस्था / चेन्नई

Advertisements

तमिळला ‘ईश्वराची भाषा’ ठरवत मद्रास उच्च न्यायालयाने देशभरातील मंदिरांमध्ये अभिषेक अजवार आणि नयनमार यासारख्या संतांकडून रचित तमिळ भजने, अरुणगिरिनाथर यांच्या कवितांच्या माध्यमातून करण्यात यावा असे म्हटले आहे.

केवळ संस्कृत हीच ईश्वराची भाषा असल्याचे आमच्या देशात मानले जाते. पण लोकांकडून बोलली जाणारी प्रत्येक भाषा ईश्वराची भाषा असल्याचे न्यायाधीश एन. किरुबाकरन आणि बी. पुगालेंधी यांच्या खंडपीठाने एका आदेशात म्हटले आहे.

विविध देश आणि धर्मांमध्ये भिन्नप्रकारच्या मान्यता आहेत आसिण पूजेची ठिकाणे देखील संस्कृती आणि धर्मानुसार बदलतात. ईश्वराशी संबंधित कार्यांसाठी त्या ठिकाणांवर स्थानिक भाषेचा वापर केला जातो. पण आमच्या देशात केवळ संस्कृत हीच ईश्वराची भाषा असल्याची धारणा असल्याचे खंडपीठाने म्हटले आहे.

संस्कृत ही प्राचीन भाषा असून अनेक प्राचीन साहित्यकृती त्याच भाषेत आहेत, याबद्दल कुठलाच संशय नाही. पण ईश्वर स्वतःच्या अनुयायांची प्रार्थना केवळ संस्कृतमधील वेदांचे पठण केले तरच ऐकेल अशी धारणा तयार करण्यात आल्याची टिप्पणी खंडपीठाने केली आहे.

तामिळनाडूतील करुर जिल्हय़ात एका मंदिरात तिरुमुराईकल, तमिळ सेवा मंतरम आणि संत अमरावती, अतरांगरई करुरर यांच्या पाठासोबत अभिषे करण्याचा निर्देश सरकारी अधिकाऱयांना देण्याची मागणी करणारी एक याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. यावर सुनावणी करताना न्यायाधीशांनी लोकांकडून बोलली जाणारी प्रत्येक भाषा ईश्वराची भाषा असल्याचे म्हटले आहे.

Related Stories

बेरोजगारीच्या मुद्दय़ावरून राहुल गांधी मोदींवर बरसले

Patil_p

अखंड साथ,अतूट नाते…; संजय राऊतांच्या मुख्यमंत्र्यांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा!

triratna

खासदार गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटीची देणगी

Amit Kulkarni

दक्षिण चीन समुद्रात अमेरिकेचे शक्तिप्रदर्शन

Patil_p

5, 10, 100 च्या जुन्या नोटा चलनातून होणार बाद

Patil_p

नितीशकुमार घेणार दिवाळीनंतर शपथ

Patil_p
error: Content is protected !!