तरुण भारत

अफगाणिस्तानात पोहोचली पहिली कमर्शियल फ्लाइट

काबूल विमानतळावर उतरले पीआयएचे विमान

वृत्तसंस्था/ काबूल

Advertisements

अफगाणिस्तानात तालिबानच्या कब्जाला आता एक महिना उलटला आहे. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने पूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर पहिल्यांदाच अफगाणिस्तानात कमर्शियल फ्लाइट लँड झाली आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे (पीआयए) एक विमान सोमवारी हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरल आहे. एएफपीच्या एक पत्रकाराने या विमानातून प्रवास केला. विमानात केवळ 10 जण होते आणि यात प्रवाशांपेक्षा विमान कंपनीच्या कर्मचाऱयांची संख्या अधिक होती. पीआयए अफगाणिस्तानसाठी नियमित स्वरुपात कमर्शियल फ्लाइट सुरू करू इच्छिते.

काबूल विमानतळावर 31 ऑगस्टपर्यंत अमेरिकेचे नियंत्रण राहिले होते. या कालावधीत तेथून 1 लाखाहून अधिक लोकांना अन्य देशांमध्ये हलविण्यात आले आहे. बचाव मोहीम संपुष्टात आल्यावर विमानतळाच्या मोठय़ा हिस्स्याचे नुकसान झाले होते, कतार आणि अन्य देशांच्या मदतीने तालिबानने याची दुरुस्ती केली आहे. मागील आठवडय़ात कतार एअरवेजची अनेक चार्टर विमाने काबूल येथे पोहोचली होती. या विमानांमधून काही लोकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यात आले आहे.

अफगाण पोलीस कामावर परतणार

काबूलमध्ये अफगाण पोलीस आता कामावर परतणार आहेत. काबूलमध्ये तैनात गणवेशविहित तालिबानी दहशतवाद्यांना प्रांतांमध्ये पाठविण्याचा आणि शहरात पोलिसांना तैनात करण्याचा निर्णय तालिबानने घेतला आहे. मागील सरकारच्या काळात तैनात असणारे कर्मचारीच यात सामील असतील.

Related Stories

पहिल्या लसीची घोषणा करण्यास रशिया सज्ज

Patil_p

भारताच्या मदतीसाठी सरसावल्या अमेरिकेतील 40 कंपन्या

datta jadhav

भारतीय मुलीला ब्रिटनचा तिसऱया क्रमांकाचा पुरस्कार

Patil_p

पाकिस्तान : व्हॅन नदीत कोसळून 17 ठार

datta jadhav

अलाउलात पर्यटकांना मिळणार प्रवेश

Patil_p

जपानच्या 7 प्रातांमध्ये आणीबाणी

Patil_p
error: Content is protected !!