तरुण भारत

16 ऑक्टोबरला झळकणार ‘सरदार उधम सिंह’

ओटीटीवर पहायला मिळणार विक्कीचा चित्रपट

अभिनेता विक्की कौशल सध्या ‘सरदार उधम सिंह’ या चित्रपटावरून चचेंत आहे. दिग्दर्शक सुजित सरकार यांचा हा चित्रपट दसऱयाच्या दिनी म्हणजेच 16 ऑक्टोबर रोजी प्रदर्शिन केला जाणार असल्याचे समजते. तसेच हा चित्रपट चित्रपटगृह नव्हे तर ओटीटी प्लॅटफॉर्म अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित केला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisements

या चित्रपटात विक्कीसोबत अमोल पराशर देखील मुख्य भूमिकेत आहे. ‘सरदार उधम सिंह’ याच नावाने क्रांतिकारकाचा बायोपिक तयार करण्यात आला आहे. सरदार उधम सिंह यांना 1940 मध्ये जुलमी ब्रिटिश अधिकारी मायकल ओ. डायर याच्या वधासाठी ओळखले जाते.

जालियांवाला बाग हत्याकांडाचा सूड उगविण्याकरता सरदार उधम सिंह यांनी डायर याचा वध केला होता. हा चित्रपट पूर्वी जानेवारी महिन्यात प्रदर्शित होणार होता, पण कोरोना संकटामुळे याचे प्रदर्शन लांबणीवर पडले होते.

Related Stories

अनन्या पांडेच्या नव्या चित्रपटाची घोषणा

Amit Kulkarni

घरीच राहून एकमेकांची काळजी घ्या : प्रल्हाद कुडतरकर

Patil_p

सुशांत सिंह राजपूतचा मित्र सिद्धार्थ पिठानीला एनसीबीकडून अटक

Abhijeet Shinde

अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल; अटकेची टांगती तलवार

Rohan_P

कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स शोमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची उत्पादने

Patil_p

ब्रह्मास्त्र’नंतर रणवीर-आलियाचा विवाह?

Patil_p
error: Content is protected !!