तरुण भारत

माऊलींचे गणेशस्तवन

श्रीगणेशाच्या पायातल्या रुणझुणत्या घागऱयांबद्दल माउलींनी काय सांगितलंय ते पाहू.

देखा काव्य नाटका ।

Advertisements

जे निर्धारितां सकौतुका ।

त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका ।

अर्थध्वनि  ।। 7।।

रामायण आणि महाभारत ही महाकाव्ये आहेत आणि त्यात जागोजागी नाटय़पूर्ण प्रसंग ठासून भरलेले आहेत. ही काव्ये वाचत असताना त्या नाटय़पूर्ण प्रसंगांकडे आपण कौतुकाने चकित होऊन पाहात राहतो. श्रीगणेशाच्या पायात ही महाकाव्ये रुणझुणत्या घागऱया होऊन बसलेली आहेत आणि त्यांचा होणारा नाद म्हणजे ह्या काव्यातला सरस अर्थ होय.

रामायण महाभारतादी महाकाव्ये अतिशय अर्थपूर्ण असून वाचत असताना त्यातील लय आपणास जाणवते व वाचून झाल्यावर ती लय आपल्या मनात रुंजी घालत असते. म्हणून माऊली म्हणतायत ह्या महाकाव्यांच्या घागऱया श्रीगणेशाने घातल्या असून त्यांचा होणारा लयबद्ध आवाज आपल्याला मोहून टाकतो.

नाना प्रमेयांची परी ।

निपुणपणें पाहतां कुसरी ।

दिसती उचित पदें माझारिं ।

रत्‍नें भलीं ।।8 ।।

ह्या ज्या महाकाव्याच्या घागऱया गणेशाने घातलेल्या आहेत त्या महाकाव्यात अनेक महत्वपूर्ण सिद्धांत सांगितलेले आहेत. त्यांचा धांडोळा घेतल्यास अनेक सुयोग्य पदरत्ने हाती पडतात.

क्रमशः गणेश भक्त

Related Stories

विशेष मुलांचा सामाजिक स्वीकार

Patil_p

भित्यापाठी ब्रह्मराक्षस…!

Patil_p

व्यवस्थापनशास्त्र मानवी व्यवहारावर आधारित

Patil_p

दासबोधाद्वारे समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य

Patil_p

पुणे-मुंबई-पुणे

Patil_p

कौमुदी उत्सव

Patil_p
error: Content is protected !!