तरुण भारत

खरीप पिकांचे यंदा विक्रमी उत्पादन

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

यंदा खरीप हंगामात अन्नधान्यांच्या उत्पादनाचा विक्रम होणार आहे. यंदा या हंगामात 15 कोटी टनांपेक्षा जास्त अन्नधान्यांचे उत्पादन अपेक्षित असून समाधानकारक पावसामुळे उत्पादनात वाढ होणार आहे. सुगीचा कालावधी ऑक्टोबरपासून सुरु होणार असून तांदूळ आणि गव्हाच्या उत्पादनात गेल्या वर्षीपेक्षा वाढ होईल, अशी माहिती कृषीसचिव संजय अग्रवाल यांनी दिली.

Advertisements

गेल्या वर्षी खरीप उत्पादन 14.96 कोटी टन इतके झाले होते. यंदा ते 15 कोटी टनाची पातळी पार करणार आहे. तांदूळ आणि गव्हाप्रमाणे डाळींच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. देशभरात पावसाचे प्रमाण दिलासादायक आहे. 15 सप्टेंबरला खरीप पिकांच्या उत्पादनाचे प्राथमिक अनुमान प्रसिद्ध होईल. यंदा खरीप पिकांच्या लागवडीखालील जमीन 11 कोटी 6 लाख हेक्टर इतकी होती. देशाच्या काही भागांमध्ये खरीपाची पेरणी अद्यापही सुरु आहे. तसेच काही तयार पिकांची आवकही सुरु झाली आहे. कर्नाटकात डाळी बाजारात येण्यग्नास प्रारंभ झाला असून 40 हजार टन डाळी विकत घेण्यास राज्य सरकारला अनुमती देण्यात आली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्यग्ना कृषी विभागाने सोमवारी दिली.

Related Stories

पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल एनआयएच्या हाती

datta jadhav

उत्तराखंड : भाजपचे प्रदेश अध्यक्ष बंशीधर भगत यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

Rohan_P

कोरोना योद्धय़ांवरील हल्लेखोर संसर्गबाधित आढळल्याने खळबळ

Patil_p

‘तौत्के’ चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनाऱ्याजवळून कच्छच्या दिशेने

datta jadhav

ज्योतिरादित्य सिंदिया यांनी पदभार स्वीकारला

Patil_p

पेगॅससच्या कंपनीशी कोणताही व्यवहार नाही

Patil_p
error: Content is protected !!