तरुण भारत

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल शपथबद्ध

अमित शहांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती

गांधीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाचे सूत्रसंचालन भूपेंद्र पटेल यांनी हाती घेतले आहे. मंगळवारी त्यांचा या राज्याची राजधानी गांधीनगर येथे शपथविधी झाला. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देवविल्नी. हा कार्यक्रम राजभवनात सोमवारी झाला. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपची सत्ता असणाऱया पाच राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पटेल यांचे ट्विटरवरुन अभिनंदन केले.

मुख्यमंत्रीपदी त्यांची निवड रविवारी झाली. भाजपच्या विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांच्या नावाचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी ठेवला. त्याला सर्व 112 आमदारांनी समर्थन दिले होते. त्यानंतर त्यांनी राज्यापालांकडे सरकार स्थापनेचा दावा केला. ते घाटलोडियग्ना मतदारसंघाचे आमदार आहेत. आमदार म्हणून ते 2017 मध्ये प्रथमच निवडून आले आहेत. विजय रुपानी यांनी अचानकपणे मुख्यमंत्रीपदाचा त्याग केल्यानंतर त्यांची निवड झाली होती.

इतर मंत्र्यांची निवड नंतर

सोमवारी केवळ पटेल यांचाच शपथविधी सोमवारी दुपारी अडीच वाजता झाला. त्यांच्या मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांचा शपथविधी येत्या काही दिवसांमध्ये होईल. मंत्र्यांची निवड केंद्रीय नेतृत्वाशी विचारविमर्श करुन केली जाईल, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली. मुख्यमंत्रीपदाची संधी दिल्यासाठी पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आहेत. त्यांच्या नेतृत्वात आपण राज्याला प्रगतीपथावर अग्रेसर करण्यात यशस्वी होऊ असे प्रतिपादन पटेल यांनी केले.

Related Stories

धन नको केवळ ‘लक्ष्मी’ हवी हुंडय़ाच्या कुप्रथेवर प्रहार

Patil_p

देशात 93,249 नव्या बाधितांची नोंद

datta jadhav

आनंदसरी महाराष्ट्रात…

Patil_p

दिल्लीत 757 नवे कोरोना रुग्ण; 16 जणांचा मृत्यू

Rohan_P

मट्टानचेरी -18 भाषिकांचे मतदारसंघात वास्तव्य

Patil_p

कर्नाटकात उद्यापासून १४ दिवसाचा कडक लॉकडाऊन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!