तरुण भारत

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज विद्यापीठाची कोनशीला

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मंगळवारी उत्तर प्रदेशातील अलिगड येथे नव्या विद्यापीठाची कोनशीला स्थापन केली जाणार आहे. सुप्रसिद्ध जाट योद्धा राजा महेंद प्रताप सिंग यांचे नाव या विद्यापीठाला देण्यात येणार आहे. कोनशीला स्थापनेनंतर त्यांचे भाषणही होणार आहे. नंतर ते अलिगड येथील संरक्षण आणि औद्योगिक कॉरीडॉरची पाहणी करतील. तसेच अलिगड विद्यापीठालाही भेट देतील.

Advertisements

हे विद्यापीठ 92 एकर भूखंडावर विस्तारले जाणार आहे. लोढा आणि मुसेपूर या खेडय़ांमधील भूमी त्यासाठी अधिग्रहित करण्यात आली आहे. शिक्षणाच्या सर्व आधुनिक सुविधांनी हे विद्यापीठ सज्ज असेल, असे स्पष्ट करण्यात आले. पुढील वर्षी उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. ही राजकीय पार्श्वभूमी या विद्यापीठाच्या स्थापना कार्यक्रमाला आहे, अशी चर्चा आहे. तसेच अलिगड व  आग्रा, कानपूर, चित्रकूट, झांशी आणि लखनौ अशा जिल्हय़ांना जोडणारा संरक्षण आणि औद्योगिक कॉरीडॉर हा देशाच्या आणि राज्याच्या प्रगतीला मोठा हातभार लावणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले. 

Related Stories

हाफिज सईदसह पाच जणांची बँक खाती सुरू

datta jadhav

1 जूनपासून नॉन एसी रेल्वे धावणार

Patil_p

मोदी सरकारच्या ‘त्या’ निर्णयाचे सुप्रीम कोर्टानेही केलं कौतुक

datta jadhav

राज्यात पुढच्या तीन तासांत विजेच्या कडकडाटसह पावसाची शक्यता

Abhijeet Shinde

देशात मागील 24 तासात 92,071 नवे कोरोना रुग्ण; 1136 मृत्यू

datta jadhav

भारतीय हद्दीत चीननं वसवलेलं गाव आधी उखडा…

datta jadhav
error: Content is protected !!