तरुण भारत

रूट, रिचर्डसन महिन्यातील सर्वोत्तम खेळाडू

ऑगस्ट महिन्यासाठी मिळाला आयसीसीचा बहुमान

वृत्तसंस्था/ दुबई

Advertisements

इंग्लंडचा कर्णधार जो रूटने भारताचा जसप्रित बुमराह व पाकिस्तानचा शाहीन आफ्रिदी यांना मागे टाकत आयसीसीचा ऑगस्ट महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान मिळविला. भारताविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत केलेल्या शानदार कामगिरीमुळे त्याला हा बहुमान प्राप्त झाला. महिलांमध्ये आयर्लंडची अष्टपैलू ईमियर रिचर्डसनची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

रूटने ऑगस्टमध्ये भारताविरुद्ध झालेल्या तीन कसोटीत 507 धावा जमविताना तीन शतके नोंदवली. या कामगिरीमुळे कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीतही त्याने अग्रस्थानावर झेप घेतली आहे. या मालिकेतील पाचवी कसोटी कोरोनाच्या कारणास्तव ऐनवेळी रद्द करावी लागली. आयसीसी व्होटिंग अकादमीतील एक सदस्य असलेल्या अष्टपैलू जेपी डय़ुमिनीनेही रूटच्या कामगिरीचे कौतुक केले.

आयर्लंडच्या रिचर्डसनला तिचीच संघसहकारी गॅबी लुईस व थायलंडची नताया बूचाथम यांच्याकडून या बहुमानासाठी कडवा प्रतिकार झाला. गेल्या महिन्यात झालेल्या महिलांच्या टी-20 वर्ल्ड कप युरोप क्वालिफायर स्पर्धेत रिचर्डसनने अप्रतिम अष्टपैलू कामगिरी केल्यामुळे तिला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही मिळाला होता. 4.19 या इŸकॉनॉमी रेटने तिने 7 बळी मिळविले तर फलंदाजीत तिने एकूण 76 धावा केल्या. त्यातील 49 धावा तिने नेरदलँड्सविरुद्ध झालेल्या शेवटच्या सामन्यात केल्या होत्या. महिन्यातील सर्वोत्तम खेळाडूच्या बहुमानासाठी निवड झाल्याने खूप आनंद झाला. संघासाठी अष्टपैलू योगदान देता आले आणि संघाला महत्त्वाच्या प्रमुख स्पर्धेत स्थान मिळवून देता आले, याचे समाधानही वाटले, अशा भावना रिचर्डसनने व्यक्त केल्या. व्होटिंग अकादमीत असणाऱया झिम्बाब्वेच्या पॉमी बांग्वानेही तिच्या योगदानाचे कौतुक केले.

Related Stories

पुरुषांच्या 100 मी. बॅकस्ट्रोकचे रिलोव्हला सुवर्ण

Patil_p

अंधांच्या तिरंगी मालिकेत पाक विजेता

Patil_p

गरीब कुटुंबांना शाहबाज नदीमकडून मदतीचा हात

Patil_p

रशियाच्या कारात्सेव्हचे पहिले एटीपी जेतेपद

Patil_p

भारत-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी आजपासून

Patil_p

इरफान पठाणलाही बाधा

Patil_p
error: Content is protected !!