तरुण भारत

द.आफ्रिकेची मालिकेत विजयी आघाडी

शम्सी-मार्करमचा भेदक मारा, डी कॉकचे नाबाद अर्धशतक

वृत्तसंस्था/ कोलंबो

Advertisements

सामनावीर तबरेझ शम्सी व ऐडन मार्करम या फिरकी गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱयाच्या आधारे दक्षिण आफ्रिकेने दुसऱया टी-20 सामन्यात यजमान लंकेवर 9 गडय़ांनी दणदणीत विजय मिळवित मालिकाविजयही निश्चित केला. तीन सामन्यांच्या मालिकेत द.आफ्रिकेने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

शम्सी व मार्करम या दोघांनीही प्रत्येकी 3 बळी टिपत लंकेचा डाव 103 धावांत गुंडाळला. त्यानंतर द.आफ्रिकेने 14.1 षटकांतच केवळ एका गडय़ाच्या मोबदल्यात विजयाचे उद्दिष्ट गाठले. यष्टिरक्षक-फलंदाज क्विन्टॉन डी कॉकने नाबाद 58 धावा फटकावताना सलामीवीर रीझा हेन्ड्रिक्ससमवेत 62 धावांची भागीदारी केली. हेन्ड्रिक्सने 18 धावा जमविल्या. डी कॉकचे हे टी-20 मधील दहावे व लंकेविरुद्ध पहिले अर्धशतक आहे. मार्करमच्या (नाबाद 21) साथीने त्याने विजयाचे सोपस्कार पूर्ण केले. मात्र द.आफ्रिकेच्या विजयाचे खरे शिल्पकार ठरले ते त्यांचे फिरकी गोलंदाज. टी-20 मानांकनात अग्रस्थानावर असणाऱया शम्सीने 20 धावांत 3 बळी मिळविले तर आघाडीचा फलंदाज असणाऱया मार्करमने आपल्या ऑफस्पिनवर 21 धावांत 3 बळी मिळवित कारकिर्दीतील सर्वोत्तम यश नोंदवले. पहिल्या सामन्यातही त्याने 48 धावांची विजयी खेळी केली होती. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱया आयपीएलच्या दुसऱया टप्प्यात मार्करम पंजाब किंग्स संघाकडून खेळणार आहे. इंग्लंडच्या डेव्हिड मलानच्या जागी त्याला या संघात घेण्यात आले आहे.

वेगवान गोलंदाज ऍन्रिच नॉर्त्जेने दिनेश चंडिमलला बाद केल्यानंतर लंकेचे उर्वरित 9 गडी फिरकी गोलंदाजांनी बाद केले. बियॉन फॉर्च्युनने 2 तर कर्णधार केशव महाराजने शेवटचा गडी बाद केला. डी कॉकने सफाईदार फलंदाजी करीत 42 चेंडूत अर्धशतक पूर्ण करीत विजय सोपा केला. लेगस्पिनर वनिंदू हसरंगाने हेन्ड्रिक्सचा एकमेव बळी मिळविला. मंगळवारी तिसरा व शेवटचा सामना याच मैदानावर होणार आहे.

संक्षिप्त धावफलक ः लंका 18.1 षटकांत सर्व बाद 103 (कुसल परेरा 30, भानुका राजपक्षे 20, शम्सी 3-20, मार्करम 3-21, फॉर्च्युन 2-12), द.आफ्रिका 14.1 षटकांत 1 बाद 105 (डी कॉक नाबाद 58, मार्करम नाबाद 21, हेन्ड्रिक्स 18).

Related Stories

राष्ट्रीय सबज्युनियर मिनी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र संघ अंतिम फेरीत

prashant_c

विश्वचषक तिरंदाजी स्पर्धेत भारताची साफ निराशा

Patil_p

रशियाचा बल्गेरियावर विजय

Patil_p

भारताचे तीन बॉक्सर्स अंतिम फेरीत

Patil_p

टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत थेंगवेलू भारताचा ध्वजधारक

Patil_p

इंग्लीश महिला फुटबॉल हंगाम समाप्तीची घोषणा

Patil_p
error: Content is protected !!