तरुण भारत

जिह्यात कोरोनाचे 51 नवे रुग्ण

प्रतिनिधी/ रत्नागिरी

जिह्यामध्ये सोमवारी कोरोनाचे 51 नवे रुग्ण मिळून आले आहेत़  44 बरे झालेल्या रुग्णांना उपचारानंतर घरी सोडण्यात आल़े रत्नागिरीतील एकाचा मृत्यू झाला आहे. मागील काही दिवसांपासून रुग्णसंख्या कमी आढळून येत आह़े जिल्हा प्रशासनाकडून आता चाकरमान्यांच्या चाचण्यादेखील हाती घेतल्या आहेत़ त्यामुळे रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आह़े

Advertisements

  जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एकूण 3 हजार 108 कोरोना चाचण्या करण्यात आल्य़ा यामध्ये आरटीपीसीआरच्या 1 हजार 537 चाचण्यांपैकी 30 तर ऍन्टिजेन टेस्टच्या 1 हजार 571  पैकी 21 जणांचे अहवाल बाधित आढळून आल़े यामध्ये मंडणगड 1, दापोली 6, खेड 4, गुहागर 3, चिपळूण 9, संगमेश्वर 5, रत्नागिरी 19, लांजा 1 तर राजापूर 3 असे तालुकानिहाय रूग्ण मिळून आले आहेत़ जिह्यातील एकूण बाधितांची संख्या आता 76 हजार 993 इतकी झाली आह़े आरटीपीसीआर टेस्टचा विचार करता जिह्याचा पॉ†िझटिव्हीटी रेट 1.95 इतका आह़े

एकूण बरे झालेल्यांची संख्या 73 हजार 337 इतकी झाली आह़े बरे होण्याचे प्रमाण 95.25 इतके आह़े तर 945 रूग्ण उपचारात दाखल करण्यात आले आहेत़ यामध्ये केवळ 228 रूग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत़

   एकूण रूग्ण -76993

नवे रूग्ण -51

   एकूण मृत्यू -2373

   मृत्यू – 1

Related Stories

कोकणातील पाटबंधारे प्रकल्पांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार

triratna

भोस्ते घाटात 30 फूट दरीत टँकर कोसळला

Patil_p

निसर्ग वादळाचा संगमेश्वरलाही तडाखा

Patil_p

मळेवाड येथे वृद्धाची आत्महत्या

NIKHIL_N

रत्नागिरी जिल्ह्यात आज २०१ पॉझिटिव्ह तर १३४ कोरोनामुक्त

triratna

खेडमध्ये दुकान फोडत सुमारे सव्वा लाखाचा ऐवज लंपास

triratna
error: Content is protected !!