तरुण भारत

ऑक्टोबर अखेरीस विधानसभा अधिवेशन

फेब्रुवारीत निवडणूक होण्याची शक्यता भूमिपुत्र विधयेक लवकरच मागे घेणार

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

गोवा राज्य विधानसभेचे या कार्यकाळातले अखेरचे अधिवेशन हे ऑक्टोबर अखेरीस दोन दिवसांचे होणार आहे. अलिकडेच भाजप आमदार व मंत्र्यांबरोबर भाजपच्या काही पदाधिकाऱयांच्या झालेल्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली आणि त्यात अधिवेशन दोन दिवसांचे घेतले जाईल, असे त्यांना सांगण्यात आले. या कार्यकाळातील ते अखेरचे अधिवेशन होईल.

त्यानंतर डिसेंबर अखेरीस विधानसभा निवडणुका जाहीर होतील. फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवडय़ात गोव्यातील निवडणुका होऊ शकतात असा अंदाज आहे. निकाल मात्र मार्चच्या पहिल्या आठवडय़ात जाहीर होईल. उत्तर प्रदेशाच्या निवडणुका 5 ते 6 टप्प्यात होण्याची शक्यता आहे.

भूमिपुत्र विधेयक मागे घेणार?

दरम्यान, गेल्या अधिवेशनात विरोधकांच्या बहिष्कारानंतर घाईघाईने संमत झालेल्या गोवा भूमिपुत्र अधिकारिणी विधेयक हे सप्टेंबर अखेरीस मागे घेतले जाणार आहे. हे विधेयक मागे घेण्यात यावे यासाठी पक्षांतर्गत सरकारवर विशेषतः मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढत आहे. भाजपमध्ये या विधेयकावर दोन मतप्रवाह असले तरी देखील बहुतांश नेत्यांना हे विधेयक मागे घ्यावे व शक्य तेवढय़ा लवकर मागे घ्यावे असे वाटते. विधानसभा अधिवेशनात यावर दुरुस्ती विधेयक आणण्याचा सरकारचा इरादा होता मात्र आता अधिवेशन जाहीर होण्याच्या अगोदर हे विधेयक मागे घेण्याचा सरकारचा इरादा आहे.

Related Stories

प्रतिभावान तरुणांर्पंत विज्ञान पोहोचले पाहिजे

Amit Kulkarni

संजीवनी कारखाना लवकरात लवकर सुरू करा

Patil_p

मिशन आत्मशोध ते समाजोद्धार..

Omkar B

आयआयटी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलन चार महिन्यांपासून सुरुच

Omkar B

सरकारच्या धमक्यांना जनतेने घाबरू नये – प्रतिमा कुतिन्हो

Omkar B

आंतरराष्ट्रीय कॉफी पेंटिंग स्पर्धेत कालिदास सातार्डेकर यांना पुरस्कार

Patil_p
error: Content is protected !!