तरुण भारत

सोमवारी रुग्णसंख्या शून्यावर

24 जणांनी केली कोरोनावर मात

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सोमवारी बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही. गेल्या 24 तासात कोरोनामुक्त झालेल्या 24 जणांना वेगवेगळय़ा इस्पितळांतून घरी पाठविण्यात आले असून चिकोडी तालुक्मयातील एका 75 वषीय वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. वृद्धाच्या मृत्युमुळे मृतांचा सरकारी आकडा 900 वर पोहोचला आहे. अद्याप 307 सक्रिय रुग्ण आहेत. त्यांच्यावर वेगवेगळय़ा इस्पितळांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. जिल्हय़ातील एकूण बाधितांची संख्या 79 हजार 521 इतकी असून त्यापैकी 78 हजार 314 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार अद्याप 2 हजार 740 जणांचे स्वॅब तपासणी अहवाल यायचे आहेत. आतापर्यंत 12 लाख 98 हजार 236 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे. यापैकी 12 लाख 11 हजार 226 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहे.

Related Stories

जितो व्यापारासोबत मानवतेसाठी कार्य करणारी संस्था

Omkar B

कोबीज फेकून शेतकऱयांनी केला निषेध

tarunbharat

राजद्रोहाच्या गुन्हय़ातून दोघांना जामीन

Amit Kulkarni

बेळगाव पोलिसांनी घेतली कडक भूमिका

Abhijeet Shinde

दीन-दलितांना निधी उपलब्ध करून द्या

Patil_p

पहिल्या दिवशी बेळगावमधील 300 उद्योग सुरू

Patil_p
error: Content is protected !!