तरुण भारत

देशात सक्रिय रुग्णसंख्येत घट

नवी दिल्ली/प्रतिनिधी

देशात गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत घट होत असल्याचं दिसत आहे. गेल्या २४ तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत 2 हजारांनी घट झाली आहे. सोमवारी देशात २५ हजार ४०४ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर ३३९ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. गेल्या २४ तासात देशात ३७ हजार १२७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

देशात एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता ३ कोटी ३२ लाख ८९ हजार ५७९ वर गेला आहे. देशात आतापर्यंत ३ कोटी २४ लाख ८४ हजार १५९ रुग्ण बरे झाले आहेत. तर ४ लाख ४३ हजार २१३ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात सध्या ३ लाख ६२ हजार २०७ रुग्ण उपचारा आहते. तसेच आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या ७५ कोटी २२ लाख ३८ हजार ३२४ इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

Advertisements

Related Stories

प्रियंका वड्रा यांना सरकारी बंगला रिकामा करण्याचे निर्देश

Patil_p

भारताची सागरी सुरक्षा अधिकच भक्कम

Patil_p

भारत-नेपाळ संयुक्त सराव सोमवारपासून

Patil_p

कुलगाममध्ये CRPF च्या 31 जवानांना कोरोनाची बाधा

datta jadhav

राज्य सरकारी कर्मचाऱयांना दिवाळीआधीच खूषखबर

Patil_p

तिसऱया फेरीतही आनंदचा पराभव

Patil_p
error: Content is protected !!