तरुण भारत

उद्यानांच्या विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष

मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील उद्यानाचीही दुर्दशा

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कॅन्टोन्मेंट परिसराच्या विकासाबरोबरच उद्यानांच्या सुशोभिकरणाचा प्रयत्न कॅन्टोन्मेंट बोर्डने केला होता. तसेच उद्यानांच्या विकासाकरिता लाखोच्या निधीची तरतूद केली होती. मात्र उद्यानांचा विकास साधण्यात कॅन्टोन्मेंट बोर्डला अपयश आले आहे. कॅम्प परिसरात मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील गार्डनची दुरवस्था झाली आहे. लहान मुलांच्या खेळाच्या साधनांसह संपूर्ण उद्यान गवत, झाडा-झुडुपांनी व्यापल्याने उद्यान नष्ट होत चालले आहे.

कॅन्टोन्मेंट व्याप्तीमध्ये अनेक खुल्या जागा आहेत. यापैकी काही खुल्या जागा उद्यानासाठी राखीव आहेत. तसेच काही जागा क्रीडांगणासाठी राखीव आहेत. पण राखीवतेनुसार जागांचा वापर केला जात नाही. कॅन्टोन्मेंटवतीने उद्यानांच्या विकासाकरिता निधीची तरतूद केली होती. मात्र निधीचा वापर करून कोणत्या उद्यानाचा विकास केला? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सध्या कॅन्टोन्मेंटमधील काही मोजकी उद्याने वगळता अन्य उद्यानांची दुरवस्था झाली आहे. उद्यानामध्ये गवत आणि झाडेझुडुपे वाढली असून सुशोभिकरणाऐवजी विद्रुपीकरण झाले आहे.

कॅन्टोन्मेंटच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील उद्यानात विविध प्रकारची झाडे असल्याने सुंदर आणि निसर्गरम्य होते. पण सध्या विकासाकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने उद्यानाची दुरवस्था झाली आहे. सदर उद्यान परिसरात शांतता असल्याने याठिकाणी अभ्यासाकरिता मुलांची गर्दी होत असे. तसेच विविध शाळांच्या सहली आयोजित करण्यात येत होत्या. मात्र याठिकाणी असलेले साहित्य खराब झाल्याने उद्यानाला अवकळा प्राप्त झाली आहे. सध्या देखभालीअभावी गवत, झाडे-झुडुपे वाढल्याने उद्यानाची दुर्दशा झाली आहे. तसेच उद्यानाच्या सभोवती असलेले तारेचे कुंपन खराब झाले आहे. परिणामी मुलांना खेळण्यासाठी सदर उद्यान धोकादायक बनले आहे.

निसर्गरम्य उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्या

उद्यानाचा विकास करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. खेळाचे साहित्य तसेच बसण्यासाठी खुर्च्या बसविण्यात आल्या होत्या. गवत व झुडुपांमुळे पहाटे आणि सायंकाळी फिरावयास येणाऱया नागरिकांना फिरण्यास मोठी अडचण निर्माण झाली आहे. दुर्लक्षित असलेल्या आणि निसर्गरम्य उद्यानाच्या सुशोभिकरणाचे काम तातडीने हाती घ्यावे, अशी मागणीही होत आहे.

Related Stories

सावगाव येथे बारा जुगाऱयांना अटक

Patil_p

पिरनवाडी येथे तरुणीची आत्महत्या

Omkar B

बाजार भरतोय मात्र उलाढाल कमीच

Amit Kulkarni

शेतकऱयांना आर्थिक बळकटी देणाऱया काजूबागा

Amit Kulkarni

उत्तीर्ण कराटेपटूंना बेल्ट प्रदान

Amit Kulkarni

यल्लाम्मा यात्रेला गेलेल्या दोन भाविकांना बसने चिरडले

Patil_p
error: Content is protected !!