तरुण भारत

मोटारसायकली चोरणाऱया युवकाला अटक

एपीएमसी पोलिसांची कारवाई, चार वाहने जप्त

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव शहर व उपनगरांमध्ये मोटारसायकली चोरणाऱया एका 25 वषीय अट्टल चोरटय़ाला अटक करण्यात आली आहे. एपीएमसी पोलिसांनी ही कारवाई केली असून सुमारे 1 लाख रुपये किमतीची चार वाहने पोलिसांनी जप्त केली आहेत.

मार्केटचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ, पोलीस उपनिरीक्षक मंजुनाथ बजंत्री, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, डी. सी. सागर, एस. जी. कोगटोळी, नामदेव लमाणी, केंपण्णा दोडमनी व त्यांच्या सहकाऱयांनी ही कारवाई केली आहे.

गेल्या दोन महिन्यात मोटारसायकली चोरीच्या घटना वाढल्या आहेत. पोलिसांनी  सतत प्रयत्न करूनही दुचाकी चोराचा थांगपत्ता लागत नाही, अशी परिस्थिती आहे. वाहनांच्या किमती वाढल्यामुळे चोरी प्रकरणातही वाढ झाली आहे. एपीएमसी पोलिसांनी एका तरुणाला अटक करून त्याच्याजवळून चोरीची वाहने जप्त केली असून त्याने कुठून वाहने चोरली, याचा तपास करण्यात येत आहे.

Related Stories

भांडणानंतर किणये येथे घर पेटविले

Patil_p

आंदोलनाची धास्ती, कामाला सुरुवात, मात्र रास्तारोको करणारच

Patil_p

ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना ठरतेय डोकेदुखी

Omkar B

क्लिनरना कमी करण्यात आल्याने आयुक्तांकडे तक्रार

Patil_p

विनायकनगरमधील रस्त्यांसाठी एक कोटीचा निधी

Patil_p

जुगारी अड्डय़ांवर छापे, पंधरा जणांना अटक

Amit Kulkarni
error: Content is protected !!