तरुण भारत

बलात्कार प्रकरणी खासदार प्रिन्स राज पासवान आणि चिराग पासवान यांच्यावर गुन्हा दाखल

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

दिल्ली पोलीसांनी बिहारचे एलजेपी खासदार प्रिन्स राज यांच्याविरोधात कॅनॉट प्लेस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीत एलजेपीचे नेते चिराग पासवान यांचेही नाव आहे. चुलतभाऊ प्रिन्सविरोधी कारवाई टाळण्यासाठी कट रचल्याचा आरोप चिराग पासवान यांच्यावर केला आहे. याबद्दल दिल्ली पोलीसांनी 9 सप्टेंबर रोजी गुन्हा नोंदवला आहे.

तक्रारीत पीडितेने आरोप केला आहे की, तीचा अश्लील व्हिडिओ बनवला गेला आहे. याच व्हिडिओला व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच तक्रार न करण्यासाठी धमकी देत दबाव टाकण्यात आला.

खासदार प्रिन्स राज यांनी फेटाळले आरोप

खासदार प्रिन्स राज यांनी ट्वीत केले असून “माझ्याविरोधात केलेले सर्व दावे खोटे, बनावट आहेत. आणि माझ्या प्रतिष्ठेला धोका पोहोचवून माझ्यावर व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या दबाव आणण्यासाठी हा एक मोठ्या गुन्हेगारी षडयंत्राचा भाग आहे. असे ही त्यांनी म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

कुंभोज बाजार म्हणजे मोबाईल चोरट्यांची पर्वणीच पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांतून तीव्र संताप

triratna

पदवी प्रमाणपत्रासाठी १२ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करा

triratna

उद्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनचा अंतिम निर्णय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Rohan_P

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाने एक मृत्यू, 46 नवे रूग्ण

triratna

पंढरपूर येथे अन्न व औषध प्रशासनाकडून तंबाखू, सुपारी जप्त

triratna

प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

datta jadhav
error: Content is protected !!