तरुण भारत

कर्नाटक : नोव्हेंबर अखेर संपूर्ण प्रौढ नागरिकांचे लसीकरण करणार: आरोग्यमंत्री

बेंगळूर/प्रतिनिधी

कर्नाटकचे आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री के सुधाकर यांनी नोव्हेंबरच्या अखेरीस प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करणार असल्याचा दावा केला आहे. आरोग्यमंत्री सुधाकर यांनी राज्यात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेमध्ये कोणतीही अडचण येत नाही. तसेच “नोव्हेंबरच्या अखेरीस संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे पूर्णपणे लसीकरण करण्यासाठी आम्ही तयार आहोत, ” असे ते म्हणाले.

मंत्री सुधाकर यांनी स्पष्ट केले की ऑगस्टमध्ये राज्याला १.१ कोटीहून अधिक डोस मिळाले आणि सप्टेंबरमध्ये आतापर्यंत सुमारे ४८.९६ लाख डोस मिळाले आहेत. केंद्राकडून लसीचा असाच पुरवठा होत राहिल्यास लवकरच राज्यात पात्र लाभार्थ्यांचे लसीकरण पूर्ण होईल.

आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत राज्यभरात कोरोना लसीचे ४.७८ कोटी डोस देण्यात आले असून त्यापैकी १.२४ कोटी (जवळजवळ २६ टक्के) दुसरे डोस होते.

Advertisements

Related Stories

कर्नाटकात ४ मे पर्यंत शनिवार-रविवार ‘कर्फ्यू’ लागू

triratna

पालघर प्रकरणाचा तपास सीआयडीकडे : गृहमंत्री अनिल देशमुख

prashant_c

दिलासादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत धारावीत पहिल्यांदाच एकही रुग्ण नाही

Rohan_P

परिवहन कर्मचारी संप : केएसआरटीसीचे पाच कर्मचारी निलंबित

triratna

”असे वाटले की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे ”

triratna

कर्नाटक: उद्योगांशी संबंधित वेबसाइट सुरू करणार: उद्योग मंत्री

triratna
error: Content is protected !!