तरुण भारत

करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडी वाढ

परळी/प्रतिनिधी

मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बेछूट आरोप करणाऱ्या कथित करुणा शर्मा यांचा ५ सप्टेंबर रोजीचा परळी दौरा वादग्रस्त ठरला. त्यांनी शहरात प्रवेश करताच धनंजय मुंडे समर्थकांनी विरोधात घोषणाबाजी करून त्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केला. पोलीस संरक्षणात करुणा शर्मा यांनी वैद्यनाथ मंदिरात जाऊन दर्शन घेतले. दरम्यान, त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने खळबळ उडाली. यांनतर करुणा शर्मा यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान, बीडमधील अंबाजोगाई सत्र न्यायालयाने जातीवाचक शिवीगाळ आणि गाडीत पिस्तूल आढळल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या न्यायालयीन कोठडीत आता वाढ केली आहे. १८ सप्टेंबरपर्यंत करुणा शर्मा या न्यायालयीत कोठडीत असणार आहेत.

५ सप्टेंबर रोजी करूणा शर्मा परळीत दाखल झाल्यानंतर त्यांच्या गाडीत पिस्तूल आढळल्याने, एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अंबाजोगाई न्यायालयात हजर करण्यात आलं होतं.

Advertisements

Related Stories

महाराष्ट्रात दुकाने, मार्केट सुरू ठेवण्यास आता 2 तास वाढीव परवानगी

Rohan_P

राजू शेट्टी दूध संघवाल्यांचे पंटर रघुनाथदादा पाटील यांची टीका

triratna

पेठ वडगाव : अर्धवट गटार बांधलेले ठेकेदार व संबंधित अधिकार्यांच्या कामाची चौकशी करा

triratna

इचलकरंजीच्या वृद्धाचा मृत्यू, आणखी ८ पॉझिटिव्ह

triratna

कोल्हापूर : कबनुरात बारा नवे कोरोना पॉझिटिव्ह, दोघे मृत

triratna

नोडल अधिकाऱ्यांनी आपापल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात

Rohan_P
error: Content is protected !!