तरुण भारत

“गाल सर्वांनाच रंगवता येतात,” रुपाली चाकणकरांच्या ‘त्या’ टीकेला दरेकरांनी दिलं उत्तर

मुंबई/प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यात आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त रामोशी समाजाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बोलताना प्रवीण दरेकरांनी सुरेखा पुणेकरांचं नाव न घेता टीका केली होती. “राष्ट्रवादी काँग्रेस हा रंगलेल्या गालाचे मुके घेणारा पक्ष आहे,” असा टोला प्रवीण दरेकरांनी यावेळी लगावला होता. यावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी उत्तर देत “आपल्या बोलण्यातून वैचारिक दारिद्र्य दिसून येत असून संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आपल्या पक्षातील काही महिला बाहेर फिरताना आपण महिलांचा कैवारी आहोत दाखवण्याचा प्रयत्न करतात, आज मला त्यांची कीव येते. तुमच्या बोलण्यामुळे तुमच्या पक्षाची काय संस्कृती आहे ती दिसून आली. प्रवीण दरेकर तुम्ही ज्या प्रकारचं वक्तव्य केलं त्याबद्दल तुम्ही महिलांची माफी मागावी अन्यथा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष महिलांचा अपमान करणाऱ्यांचं गाल आणि थोबाड रंगवून दाखवू शकतं,” असा इशारा रुपाली चाकणकर यांनी दिला होता. आता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादीला प्रत्युत्तर दिलं आहे.

लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर येत्या १६ सप्टेंबर रोजी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रवीण दरेकर यांनी एक खळबळजनक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी दरेकर यांच्यावर अत्यंत कडक शब्दांत टीका केली होती. आता चाकणकर यांच्या टीकेला प्रवीण दरेकर यांनी उत्तर दिलं आहे. “मी कुणाच्या वक्तव्याला फारसं महत्व देत नाही. कारण, अशा वक्तव्यांमुळेच त्यांना थोडीफार प्रसिध्दी मिळते. पण गाल सर्वांनाच रंगवता येतात. अतिरेकी भाषा करू नये”, असा इशारा दरेकर यांनी रुपाली चाकणकर यांना दिला आहे. यामुळे आता हा वाद आणखी चघळणार का? असा प्रश्न उपस्थित होतो आहे.

प्रवीण दरेकर यांच्या संबंधित विधानानंतर राष्ट्रवादीकडून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या. रुपाली चाकणकर यांनी देखील कडक शब्दांत टीका केली होती. त्यावर आज (१४ सप्टेंबर) बोलताना प्रवीण दरेकर यांनी देखील टोकाची प्रतिक्रिया दिली आहे

Advertisements

Related Stories

धोका वाढला! नाशिकमध्ये आढळले ‘डेल्टा’चे 30 रुग्ण

Rohan_P

कोल्हापूर : रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या दोघांना अटक

triratna

अमेरिकेत मृत्यूतांडव; 24 तासात कोरोनाचे 2494 बळी

prashant_c

सांगली : मिरजेत कंटेन्मेंट झोनमध्ये शॉर्टसर्किट

triratna

कोरोना लढाईसाठी मोदींकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना पाच सूचना

prashant_c

गांधीनगर परिसरात कोरोना पॉझिटिव्हचा शतकी आकडा पार

triratna
error: Content is protected !!