तरुण भारत

सांगली : संस्थानच्या गणपतीचे साधेपणाने विसर्जन

श्रीमंत विजयसिंहराजे यांच्याहस्ते दरबार हॉल येथे झाली आरती

प्रतिनिधी / सांगली

Advertisements

सांगलीचे आराध्य दैवत श्री गजानन आणि श्री गणपती पंचायतन संस्थानच्यावतीचा गणेशोत्सव कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे अत्यंत साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे. मंगळवारी सांगली संस्थानचे प्रमुख श्रीमंत विजयसिंहराजे पटवर्धन आणि श्रीराजलक्ष्मीराजे पटवर्धन यांच्याहस्ते सांगली संस्थानच्या गणपतीची दरबार हॉल येथे आरती करून साधेपणाने विसर्जन करण्यात आल. यावेळी कोणीही गर्दी करू नये असे आवाहन संस्थानचे व्यवस्थापक जयदीप अभ्यंकर यांनी केले होते. तरीसुध्दा भाविकांनी राजवाडा परिसर आणि कृष्णा नदीच्या तीरावर गर्दी केली होती.

संस्थानच्या गणपतीची प्रतिष्ठापना शुक्रवारी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन, श्रीराजलक्ष्मीराजे पटवर्धन, पोर्णिमा पटवर्धन यांच्यासह राजपरिवारातील सदस्यांच्या उपस्थित राजवाडा येथील दरबार हॉल येथे झाली होती. पण कोरोनाच्या संकटामुळे दरबार हॉल येथे कोणतेही कार्यक्रम आयोजित करण्यात आले नव्हते सर्व धार्मिक कार्यक्रम घरगुती करण्यात आले होते. या कार्यक्रमाला कोणालाही परवानगी देण्यात आली नव्हती. सलग दुसऱयावर्षी कोणतीही मिरवणूक, वाजंत्री अथवा अन्य कोणताही लवाजमा नसणार आहे.

तसेच पूर्णपणे सामाजिक सुरक्षिततेचे पालन करून विसर्जन करण्यात आले आहे. दरबार हॉलमध्ये संस्थानच्या नियमानुसार आरती केल्यानंतर संस्थानच्या वाहनातून ही मुर्ती थेट सरकारी घाटावर नेण्यात आली. थ्याठिकाणी सजविलेल्या होडीतून कृष्णा नदीच्या मध्यावर नेवून ही मुर्ती विसर्जित केली आहे. सलग दुसऱयावर्षी संस्थानचा गणेशोत्सव साध्या पध्दतीने साजरा करण्यात आला आहे.

Related Stories

कृष्णा नदीची पाणी पातळी आणखी १०-१२ फुटाने वाढण्याची शक्यता

triratna

उपेक्षित माणसांच्या अलक्षित जगण्याचे मुलुखमातीमधून चित्रण

triratna

सांगली : आष्टा शहर उपनगराध्यक्षा मनीषा जाधव यांनी दिला राजीनामा

triratna

हिरोळी येथे तरुणाचा खून, प्रेत टाकले बोरी पात्रात

triratna

सांगली : अन्यथा जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन – पालकमंत्री जयंत पाटील

triratna

सांगली : कुपवाड घरफोडी प्रकरणी चोरट्यास अटक, ७६ हजाराचे दागिने हस्तगत

triratna
error: Content is protected !!