तरुण भारत

पाकिस्तानला धडा शिकविणार अमेरिका

बिगरनाटो-सहकारी देशाचा दर्जा संपविणार

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

Advertisements

तालिबानला उघड मदत करणारा पाकिस्तान आता अमेरिकेच्या निशाण्यावर आहे. पाकिस्तानच्या मागील 20 वर्षांमधील भूमिकेची चौकशी केली जाणार असल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे. तसेच बिगरनाटो सहकाऱयाच्या स्वरुपात पाकिस्तानला मिळालेला दर्जा समाप्त करण्याची मागणी उपस्थित झाली आहे.

9/11 हल्ल्यापासून आतापर्यंत पाकिस्तानने तालिबानला पुन्हा उभे राहण्यास संरक्षण, मदत आणि स्वतःची भूमी उपलब्ध केली आहे. याचमुळे विदेशमंत्र्यांपासून  अमेरिकेच्या खासदारांमध्ये पाकिस्तानबद्दल मोठी नाराजी आहे. पाकिस्तानच्या भूमिकेवरून संतप्त खासदारांना जो बायडेन प्रशासनाने या देशाच्या दुहेरी भूमिकेची चौकशी करण्याचे आणि गरज भासल्यास कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. 

बिगरनाटो सहकाऱयाच्या स्वरुपात आतापर्यंत पाकिस्तानला प्राप्त असलेला दर्जा संपुष्टात आणला जावा अशी मागणी टेक्सासचे डेमोक्रेट खासदार जोक्विन कास्ट्रो यांनी बायडेन प्रशासनाकडे केली आहे. या मागणीला अन्य खासदारांनीही समर्थन दिले आहे. तालिबानला पोसणाऱया पाकिस्तानला सहकारी मानणे मोठी चूक ठरेल असे खासदारांनी म्हटले आहे. पाकिस्तानने अफगाणिस्तान प्रकरणी नेहमीच नकारात्मक भूमिका बजावली आहे. पाकिस्तानचे हक्कानी नेटवर्कसोबत नेहमीच संबंध राहिले आहेत. पाकिस्तानच अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या सैनिकांच्या मृत्यूस जबाबदार असल्याचे संसदच्या विदेशविषयक उपसमितीच्या सदस्यांसह अनेक खासदारांनी म्हटले आहे. अफगाणिस्तान प्रकरणी विदेशमंत्री ब्लिंकेन यांना रिपब्लिकन खासदारांच्या विरोधाला तोंड द्यावे लागले आहे.

Related Stories

#TokyoParalympics : गूगलचे खास डूडल पाहिले का ?

triratna

भारतासोबत फायजर कंपनीची चर्चा सुरू

Patil_p

महिला अन् वृद्धांमध्ये तुलनेत अधिक अँटीबॉडीज

Patil_p

नीरव मोदीला ब्रिटनच्या न्यायालयाकडून आणखी एक झटका

datta jadhav

‘या’ भागात केवळ महिलांचेच राज्य

Patil_p

अमेरिकेकडून सीहॉक हेलिकॉप्टर्स मिळणार

Patil_p
error: Content is protected !!